शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ठिणगी; नाना पटोलेंचे फोन घेणंही उद्धव ठाकरेंनी टाळलं?
3
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
4
महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुस्लीम महिलेनं दिला बाळाला जन्म; दाम्पत्यानं ठेवलं देवीचं नाव!
5
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
6
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
7
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
8
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
9
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
10
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
11
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
12
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
13
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
14
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
15
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
16
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
17
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
18
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
19
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
20
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान

काय सांगता? SHIVDE I AM SORRY नंतर आता 'या' पोस्टरची रंगली जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 3:38 PM

Lucknow News : प्रेयसीवर असलेल्या प्रेमापोटी काही महिन्यांपूर्वी एका प्रियकराने रस्त्यांवर ‘शिवडे आय एम सॉरी!’ अशा आशयाचे तब्बल 300 पोस्टर्स लावले होते.

नवी दिल्ली - प्रेयसीला पटवण्यासाठी एखादा प्रियकर काय करेल याचा काही नेम नाही. प्रेयसीवर असलेल्या प्रेमापोटी काही महिन्यांपूर्वी एका प्रियकराने रस्त्यांवर ‘शिवडे आय एम सॉरी!’ अशा आशयाचे तब्बल 300 पोस्टर्स लावले होते. तरुणाच्या या विचित्र कारनाम्यामुळे पोलीसही चक्रावून गेले होते. पिंपरीमध्ये हा प्रकार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच एका पोस्टरची जोरदार चर्चा रंगली आहे. लखनऊमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला आहे. 

फेब्रुवारी महिना हा कपल्ससाठी अत्यंत खास असतो. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक जण आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करतात. अशातच एका पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या गोमती नगरच्या चौकांमध्ये एक पोस्टर लावण्यात आलं आहे. "सिद्धी हेट शिवा" असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. प्रेमात धोका मिळालेल्या तरुणीने आपल्या प्रियकराला बदनाम करण्यासाठी रस्त्यावर पोस्टर लावल्याचं म्हटलं जात आहे. 

शहरामध्ये पाच ते सहा ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आलं आहेत. "सिद्धी हेट शिवा" हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. सध्या व्हॅलेंटाईन वीक असल्याने सर्वत्र फक्त त्याचीच चर्चा सुरू आहे. हे पोस्टर नेमकं कोणी आणि का लावलं आहे, हे अद्यापही समोर आलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही महिन्यांपूर्वी उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या पिंपळेसौदागर या परिसरातील शिवार चौकात  'shivade i am  sorry''असा मजकूर लिहिलेले फलक झळकले होते.

पुण्याच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर हे फलक दिसू लागल्याने पोलिसांनी याप्रकरणाचा शोध घेतला. पोलिसांना तपासादरम्यान नीलेश खेडकर या पुण्यातील तरुणाने त्याचा मित्र आदित्य शिंदे याला असे फलक लावायला सांगितल्याचं समजलं. रस्त्यावरील ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे बॅनर पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. सोशल मीडियावरही या बॅनरचे खूप फोटो जोरदार व्हायरल झाले होते. 

 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपIndiaभारत