मालकिणीच्या काळजीने कुत्रा व्याकूळ; रुग्णवाहिकेमागे धावत पोहोचला रुग्णालयात; भावुक करणारा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 12:29 IST2021-06-12T12:17:23+5:302021-06-12T12:29:28+5:30

Loyal Dog : मालकिणीच्या काळजीने कुत्रा व्याकूळ झाल्याची एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे.

loyal dog chases ambulance taking sick owner to the hospital in turkey video viral | मालकिणीच्या काळजीने कुत्रा व्याकूळ; रुग्णवाहिकेमागे धावत पोहोचला रुग्णालयात; भावुक करणारा क्षण

मालकिणीच्या काळजीने कुत्रा व्याकूळ; रुग्णवाहिकेमागे धावत पोहोचला रुग्णालयात; भावुक करणारा क्षण

प्राणी-पक्ष्यांची अनेकांना आवड असते. विशेषत: कुत्रा आणि मांजर ही कित्येकांच्या घरात असते. आपण पाळीव प्राण्यांना जितका जीव लावतो, तितकेच तेदेखील आपल्यावर प्रेम करतात. अशीच एक भावुक करणारी घटना समोर आली आहे. मालकिणीच्या काळजीने कुत्रा व्याकूळ झाल्याची एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. मालकीण आजारी पडल्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी त्या रुग्णवाहिकेसोबत धावत धावत कुत्रा देखील रुग्णालयात पोहोचला आहे. 

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कुत्रा रुग्णवाहिकेचा पाठलाग करताना दिसत आहे. कुत्राच्या इमानदारीचे अनेक किस्से आपण नेहमीच ऐकतो. मात्र या घटनेने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, महिलेची प्रकृती बरी नसल्याने बरेच दिवस तिच्यावर घरीच उपचार सुरू होते. यावेळी हा कुत्राही तिच्याजवळच बसून राहात असे. मात्र याच दरम्यान अचानक तिची प्रकृती आणखी ढासळली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली. 

महिलेला रुग्णवाहिकेतून नेत असताना कुत्र्याने देखील आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आतमध्ये घेण्यात आले नाही. मात्र त्यानंतर रुग्णवाहिका सुरू झाल्यावर तो तिच्यामागे धावत थेट रुग्णालयापर्यंत पोहोचला आहे. इतकंच नाही तर जोपर्यंत महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते, तोपर्यंत तो तिथेच बसून राहिला आणि तिला जेव्हा घरी सोडण्यात आलं तेव्हा तिच्यासोबतच घरी परत आला आहे. या घटनेनंतर सर्वांनीच कुत्र्याचं भरभरून कौतुक केलं आहे. तसेच याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: loyal dog chases ambulance taking sick owner to the hospital in turkey video viral