केवढा हा दिलखुलासपणा! लिव्ह इनमध्ये होते; मध्येच त्याच्या कंपनीतील तरुणीची एन्ट्री झाली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 17:33 IST2022-11-30T17:30:43+5:302022-11-30T17:33:09+5:30

सोशल मीडियाच्या युगात अनोख्या लव्ह स्टोरी तुफान व्हायरल होत आहेत. अशीच एक प्रेम कहाणी सध्या इंटरनेटवर लक्ष वेधुन घेत आहे.

live-in-couple-fall-in-love-with-same-women-starts-family-of-three-love-story | केवढा हा दिलखुलासपणा! लिव्ह इनमध्ये होते; मध्येच त्याच्या कंपनीतील तरुणीची एन्ट्री झाली अन्...

केवढा हा दिलखुलासपणा! लिव्ह इनमध्ये होते; मध्येच त्याच्या कंपनीतील तरुणीची एन्ट्री झाली अन्...

Love story : जगात अनेक अनोख्या प्रेम कहाण्या आहेत. सोशल मीडियाच्या युगात या लव्ह स्टोरी तुफान व्हायरल होत आहेत. अशीच एक प्रेम कहाणी सध्या इंटरनेटवर लक्ष वेधुन घेत आहे. एका कंपनीचा बॉस आपल्याच कंपनीतील Receptionist रिसेप्शनिस्टच्या प्रेमात पडतो. विशेष म्हणजे या बॉसच्या पत्नीला ही ती  रिसेप्शनिस्ट आवडायला लागते. यानंतर हे तिघेही एकत्र राहू लागतात. ही कोणती सिनेमाची कहाणी नाही तर खरीखुरी घडलेली आहे.

रॉबर्ट मैककॉय, डेस्टिनी ग्रिफिन आणि व्हिक्टोरिया गिब्सन हे तिघेही अमेरिकेतील California कॅलिफोर्निया येथे राहतात. रॉबर्ट आणि डेस्टिनी यांचे पाच वर्षांपुर्वीच लग्न झाले आहे. यानंतर त्यांच्या आयुष्यात व्हिक्टोरिया आली. व्हिक्टोरिया रॉबर्टच्या कंपनीत रिसेप्शनिस्ट आहे. हे तिघेही सोबत वेळ घालवायचे. हळूहळू त्यांना एकमेकांविषयी Love प्रेमाची भावना निर्माण झाली. मग तिघेही सोबत राहू लागले. आता या तिघांचे कुटुंब आहे. 

सर्वात आधी व्हिक्टोरिया प्रेग्नंट झाली, मात्र तिचा गर्भपात झाला. याच दिवशी डेस्टिनी ला समजले की ती प्रेग्नंट आहे. डेस्टिनीने मुलाला जन्म दिला. व्हिक्टोरिया ने मुलाखतीत सांगितले, 'आम्ही अनेक दिवसांपासून कुटुंब सुरु करण्याचा प्लॅन करत होतो. रॉबर्टने हे सुचवले होते. आता आम्ही तिघे मुलाचे आई वडील आहोत. मी अशा आयुष्याची कल्पनाही केली नव्हती. पण आता हे आयुष्य माझ्यासमोर आहे याहून वेगळं मला काही नको.'

Web Title: live-in-couple-fall-in-love-with-same-women-starts-family-of-three-love-story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.