Video: सिंहांचं भांडण, म्हशीला लाभ... हा व्हिडीओ पाहून पुलंची 'म्हैस' आठवेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 04:02 PM2019-09-04T16:02:48+5:302019-09-04T16:03:58+5:30

आपण सर्वांनीच एक वाक्य ऐकलं आहे... 'देव तारी त्याला कोण मारी'. या वाक्याची प्रतिची तुम्हाला व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नक्कीच येईल. ट्विटरवर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. 

Lions fight over buffalo to eat see what happens next viral video | Video: सिंहांचं भांडण, म्हशीला लाभ... हा व्हिडीओ पाहून पुलंची 'म्हैस' आठवेल!

Video: सिंहांचं भांडण, म्हशीला लाभ... हा व्हिडीओ पाहून पुलंची 'म्हैस' आठवेल!

googlenewsNext

आपण सर्वांनीच एक वाक्य ऐकलं आहे... 'देव तारी त्याला कोण मारी'. या वाक्याची प्रतिची तुम्हाला व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नक्कीच येईल. ट्विटरवर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये 5 सिंह एका म्हशीची शिकार करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ साउथ आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमधील असून भारतीय वन सेवेचे अधिकारी  प्रवीण कासवान यानी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

म्हैशीची शिकार केल्यानंतर एका सिंह तिला खाण्यासाठी तिच्यावर तुटून पडतो. परंतु, एका सिंहाला राग आला आणि म्हशीला खात असलेल्या सिंहावर त्याने हमला केला. त्यानंतर तिथे असलेल्या सगळ्याच सिंहांमध्ये भांडणं सुरू झाली. सिंह भांडत असतानाच म्हैस उठली आणि तिच्या कळपाकडे निघून गेली. 

प्रवीण कासवान यांनी व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी कॅप्शन असं लिहिलं आहे की, 'कदाचित या सिंहाना चांगलाच धडा मिळाला असेल. खाणं खात होते. पण त्याआधी त्यांनी भांडण करणं योग्य समजलं पण हातातली शिकार निघून गेली.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ 2 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केला असून 600 पेक्षा जास्त  रि-ट्वीट्स आणि 17 हजार व्ह्यू मिळाले आहेत. एका यूजरने असं लिहिलं आहे की, 'सिंहाना चांगला धडा मिळाला पण व्हिडीओ पाहिल्यानंतर मलाही चांगला धडा मिळाला. कारण आपलं जेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर कोणतीही कामं.' तसेच एका यूजरने लिहिलं आहे की, 'म्हैशीला जीवन मिळालं.'

Web Title: Lions fight over buffalo to eat see what happens next viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.