Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:52 IST2025-11-13T13:51:53+5:302025-11-13T13:52:50+5:30
कपलसाठी सामान्य भेट ‘ड्रीम डेट’ बनली!

Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या बार्सिलोना शहरातील एका कपलची साधीशी रोमँटिक डेट नाईट इंटरनेटवर व्हायरल सेंसेशन बनली आहे. याचे कारणही खास आहे. त्यांच्या व्हिडिओमध्ये अचानक एक असा व्यक्ती दिसला, ज्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये बार्सिलोना शहराच्या सुंदर प्रकाशात आणि फुलांनी सजलेल्या रस्त्यांवर कपल रोमॅन्टिक अंदाजात आपले सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपत होते. सगळं काही सिनेमासारखं सुंदर चालू असतानाच, अचानक व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये काही लोक चालताना दिसले. सुरुवातीला काही विशेष वाटले नाही, पण काही क्षणांतच तरुणाच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. मुलगीही आश्चर्याने त्या व्यक्तीकडे पाहात राहिली.
❕Messi walking in the background of a couple’s video in Barcelona last night:
— Reshad Rahman (@ReshadFCB) November 10, 2025
pic.twitter.com/TMWdI5FjBv
कॅमेऱ्यात जो व्यक्ती फ्रेममध्ये दिसला, तो साधा सुधा कोणी नव्हता, तर फूटबॉलचा जादूगर लिओनेल मेस्सी होता. फ्रेममध्ये मेस्सी आणि आपल्या मित्रांसोबत चालताना दिसला. हा क्षण त्या कपलसाठी कायमचा आठवणीत राहणारा क्षण बनला.
सोशल मीडियावर चर्चा आणि मजेशीर प्रतिक्रिया
काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो पाहिला आणि कमेंट्समध्ये मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. कुणी लिहिले- “लव्ह + मेस्सी = परफेक्ट डेट नाईट”, तर कुणी म्हणाले- “असा फॅन मोमेंट आयुष्यात एकदाच मिळतो!” या अनोख्या योगायोगाने एका साध्या डेट नाईटला जागतिक प्रसिद्धी मिळाली!