Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 21:21 IST2025-08-01T21:20:28+5:302025-08-01T21:21:05+5:30
lion lioness fight viral video: नवरा बाहेर कितीही 'सिंह' असला तरी बायकोपुढे त्याची 'शेळी' होते, असे अनेकदा मजेशीर पद्धतीने म्हटले जाते

Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
lion lioness fight viral video: नवरा बाहेर कितीही 'सिंह' असला तरी बायकोपुढे त्याची 'शेळी' होते, असे अनेकदा मजेशीर पद्धतीने म्हटले जाते. यावर साऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येऊ शकतील. पण सध्या सोशल मीडियावर एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क सिंहाचीच 'शेळी' झाल्याचे दृश्य दिसते. हा व्हिडीओ सिंहाचा असला तरीही लोकांना मात्र हा व्हिडीओ पाहून हसायला येत आहे. त्यामागचे कारणही खास आहे. कारण व्हिडिओमध्ये, 'जंगलाचा राजा' म्हणजेच सिंह हा त्याच्या 'राणी'ला म्हणजेच सिंहीणीला घाबरताना दिसत आहे. व्हिडिओतील सर्वात मजेदार भाग म्हणजे सिंहाला जेव्हा सिंहीण मारते, तेव्हा सिंहाचा चेहरा केविलवाणा होताना दिसतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिंहीण खूप रागावलेली आहे आणि तिच्या नखांनी सिंहावर हल्ला करत आहे. पुढच्याच क्षणी ती सिंहापुढे इतकी आक्रमक होते की कुणीही त्याची कल्पना करू शकणार नाही. 'जंगलाचा राजा' असणारा सिंह सिंहीणपुढे लोळण घेतो आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात जातो. मग तो कसाबसा सिंहीणीच्या रागातून सुटण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर असे दिसते की, जंगलचा राजा सिंहाचेदेखील सिंहीणपुढे फारसे काही चालत नाही. पाहा व्हिडीओ-
His shocked face 😂😂 pic.twitter.com/WefsOe46K1
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) July 3, 2025
हा व्हिडिओ ट्विटरवर (पूर्वीचे ट्विटर) @AMAZlNGNATURE या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ९२ लाखांहून अधिक वेळा तो पाहिला गेला आहे. नेटिझन्स याला पती-पत्नीमधील नात्याशी जोडत आहेत आणि मजेदार कमेंट्स करत आहेत.