Viral Video: एका प्राण्याला येताना बघुन सिंहाचा कळप भीतीने पळाला, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 17:36 IST2022-04-12T17:30:52+5:302022-04-12T17:36:52+5:30
सिंहाला दुसऱ्या कुणा प्राण्याला घाबरताना पाहिलं आहे. तेसुद्धा कळपात असताना. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

Viral Video: एका प्राण्याला येताना बघुन सिंहाचा कळप भीतीने पळाला, विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडिओ
सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं (Lion video). सिंहाला पाहून भल्याभल्या प्राण्यांना घाम फुटतो. एकटा सिंहही भारी पडतो. त्यामुळे कोणताच प्राणी सिंहाशी स्वतःहून पंगा घेत नाही. अशा सिंहाला दुसऱ्या कुणा प्राण्याला घाबरताना पाहिलं आहे. तेसुद्धा कळपात असताना. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
सिंहासमोर असा प्राणी आला ज्याला पाहून त्यांनाही घाम फुटला. कळपात असूनही हा प्राणी समोर येताच सर्वच्या सर्व सिंह घाबरून पळाले. व्हिडीओत पाहू शकता सिंहांचा कळप बसलेला आहे. सर्वजण आराम करत आहेत. बरेच सिंह आहेत. सिंह, सिंहिणी आणि बछडेही आहेत. इतक्यात समोरून असे प्राणी आले, ज्यांना पाहून सिंहांची तंतरली. सर्वजण तिथून उठले आणि तिथून त्यांनी धूम ठोकली.
felines.addicts नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. कळपात असलेल्या सिंहांची अशी अवस्था कधीच पाहिली नव्हती. अशी प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे. आता सिंहासारखा प्राणी घाबरला असा हा प्राणी आहे तरी कोण हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हा प्राणी म्हणजे हत्ती आहे. हो यात गजराजाला जंगलाचा राजाही घाबरला.
हत्ती तसे शांत प्राणी पण सिंहांना पाहून ते चवताळतात. असंच या व्हिडीओतही पाहायला मिळतं. हत्तींचा कळप सिंहांसमोर आवेशात आला. तसे सिंहही घाबरले. त्यांनी तिथून गुपचूपपणे काढता पाय घेतला. हत्ती त्यांच्याजवळ येण्याआधीच सिंह तिथून त्यांच्यापासून दूर निघून गेले.