VIDEO : झाडावर चढून खाली कसं उतरावं विसरला जंगलाचा राजा सिंह आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 09:36 IST2023-01-19T09:34:57+5:302023-01-19T09:36:27+5:30

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक सिंह जंगलातील एका वाळलेल्या झाडावर चढला तर सहजपणे, पण खाली उतरणं त्याला फारच अवघड गेलं.

Lion forgot to get down from tree after climbing slipped and fell badly | VIDEO : झाडावर चढून खाली कसं उतरावं विसरला जंगलाचा राजा सिंह आणि मग...

VIDEO : झाडावर चढून खाली कसं उतरावं विसरला जंगलाचा राजा सिंह आणि मग...

Lion Viral Video: जसे की, आपण सर्वाना माहीत आहे की, जंगलाचा राजा सिंह असतो. त्याने जर कुणावर हल्ला केला तर समोरच्याचा जीव गेल्याशिवाय राहत नाही. त्याची हिंमत आणि ताकदीला तोड नाही. जंगलातील सगळे प्राणी त्याच्यासमोर कमीच वाटतात आणि तो जेव्हा शिकारीला निघतो तेव्हाही त्याची स्फूर्ती बघण्यासारखी असते. पण अनेकदा सिंह काही चुकाही करतो. असाच एक व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहोत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक सिंह जंगलातील एका वाळलेल्या झाडावर चढला तर सहजपणे, पण खाली उतरणं त्याला फारच अवघड गेलं. झाडावर चढल्यावर सिंहाला प्रश्न पडला की, आता खाली कसं उतरायचं? जसा त्याने खाली उतरण्याचा प्रयत्न केला तो धडामकन् खाली पडला. 

हा व्हिडीओ काही सेकंदाचाच आहे. पण यातून हे शिकायला मिळतं की, कुणी कितीही शक्तीशाली असो त्यांना चुकीची शिक्षा मिळतेच. असंच काहीसं जंगलाचा राजा सिंहासोबत झालेलं दिसतं.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, सिंह कसा झाडावरून खाली पडली आणि काही वेळ तो पायांवर उभा होऊ शकला नाही. इन्स्टावर हा व्हिडीओ waowafrica नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाच्या या व्हिडीओला 5 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर हजारो व्ह्यूज आहेत.

Web Title: Lion forgot to get down from tree after climbing slipped and fell badly