शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

सिंहाच्या पिल्लानं चिंपाझींच्या पिल्लांची अशी घेतली शाळा, एकदा हा मजेशीर व्हिडिओ पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 4:33 PM

एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये गंमतीसोबतच काही आश्चर्यकारक गोष्टीही आहेत. हा व्हिडिओ सिंहाचा छावा आणि दोन चिंपांझीच्या पिल्लांचा आहे.

लहान मुले असो वा प्राणी, ते लहान असताना खूप गोंडस दिसतात. त्याची कृत्यं, त्याचा धिंगाणा पाहण्यासारखा असतो. तुम्हाला सोशल मीडियावर तुम्हाला लहान मुलांचे किंवा प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, त्यातील काही खूप मजेदार आणि हसवणारे असतात. तर काही इतके भावूक करणारे आणि डोळ्यातून पाणीही आणणारेही असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये गंमतीसोबतच काही आश्चर्यकारक गोष्टीही आहेत. हा व्हिडिओ सिंहाचा छावा आणि दोन चिंपांझीच्या पिल्लांचा आहे.

खरं तर सिंहांना जंगलाचा राजा म्हटले जातं. सिंह लहान असला तरी, त्यांच्या भीतीने संपूर्ण जंगल हादरतं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, असंच दृश्यं दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सिंहाचा एक पाळिव छावा फिरताना दिसतोय, त्याच्यासमोर एक जण चिंपाझीची पिलं सोडतो, त्यानंतर जे होतं, ते तुम्हाला खूप हसवेल.

जेव्हा चिंपांझींच्या पिलांना या सिंहाच्या पिलासमोर सोडलं जातं, तेव्हा चिंपांझीची पिलं खूप घाबरतात. त्यांना वाटतं की, हे सिंहाचं पिल्लू त्यांच्यावर हल्ला करेल, याच भितीने आधी चिंपाझींचं एक पिल्लू त्याला हाताने मारतं, त्यानंतरही सिंहाचं पिल्लू ऐकत नाही. त्यानंतर चिंपाझींचे एक पिल्लू दुसऱ्याला चिटकून बसतं. यानंतर ते दोघेही एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून सिंह त्यांचे काहीही नुकसान करू शकत नाही.

हा व्हिडिओ खूप मजेदार आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर wonderfuldixe नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत 1 लाख 16 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 7 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMonkeyमाकड