VIDEO : बिबट्याचे शिकार करतानाचे खूप व्हिडीओ पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 16:09 IST2022-02-02T16:07:07+5:302022-02-02T16:09:28+5:30
Leopard Viral Video: बिबट्याला जंगलात एखाद्या जीवाची शिकार (Leopard) करणं फार अवघड काम आहे. जेव्हा बिबट्या शिकार करतो तेव्हा तो नजारा बघण्यासारखा असतो.

VIDEO : बिबट्याचे शिकार करतानाचे खूप व्हिडीओ पाहिले असतील, पण असा नक्कीच पाहिला नसेल!
Leopard Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जास्तकरून लोक तेच व्हिडीओ बघतात जे त्यांना आवडतात किंवा काही असे व्हिडीओ जे तुम्हाला हैराण करतात. सोशल मीडियावर अलिकडे प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी फनी तर कधी हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून लोक थक्क झाले आहेत.
बिबट्याला जंगलात एखाद्या जीवाची शिकार (Leopard) करणं फार अवघड काम आहे. जेव्हा बिबट्या शिकार करतो तेव्हा तो नजारा बघण्यासारखा असतो. त्याच्या स्पीडकडे बघून थक्क व्हायला होतं. सध्या बिबट्याचा एका वेगळ्या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बिबट्या जंगलातील मोकळ्या जागेत नाही तर पाण्याच्या आत शिकार करत आहे. तो त्याच्या पाण्यात पोहता पोहता पंजाने शिकार पकतो.
Jaguars are excellent swimmers. @ Andru Edwards pic.twitter.com/2RwbADybH5
— Amazing Nature (@AmazingNature00) January 31, 2022
हा व्हिडीओ @AmazingNature00 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनला लिहिलं आहे की, 'बिबट्या एक चांगला शिकारी आणि एक चांगला स्वीमर आहे'. या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ७० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'मी पहिल्यांदाच एका बिबट्याला पाण्याच्या आत शिकार करताना पाहिलं'.
हे पण वाचा :
काही हजारांसाठी करायचा सेल्समनची नोकरी, आता एका सिनेमासाठी घेतो कोट्यावधी रूपये!