बिबट्या रानमांजरीची शिकार करणारच होता, पण 'प्लॅन' फसला... पाहा नेमकं काय घडलं (VIDEO)

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:43 IST2025-01-03T09:42:13+5:302025-01-03T09:43:06+5:30

Leopard stalks Civet, forest hunting viral video: बिबट्या चपळ अन् धूर्त, तरीही कशी निसटून पळाली रानमांजर, पाहा व्हिडीओ...

leopard stalks civet cat in jungle hunting see what happens next viral video trending social media | बिबट्या रानमांजरीची शिकार करणारच होता, पण 'प्लॅन' फसला... पाहा नेमकं काय घडलं (VIDEO)

बिबट्या रानमांजरीची शिकार करणारच होता, पण 'प्लॅन' फसला... पाहा नेमकं काय घडलं (VIDEO)

Leopard stalks Civet, forest hunting viral video: वन्य प्राणी आणि शिकार अशा गोष्टींची जेव्हा चर्चा होते, तेव्हा त्यात सर्वात आधी बिबट्याचे नाव घेतले जाते. बिबट्या हा अत्यंत चपळ आणि तितकाच धूर्त प्राणी आहे. तो सावज हेरतो आणि नंतर वेगाने पाठलाग करत भक्ष्याचा फडशा पाडतो. मात्र, कधी कधी बिबट्याचा देखील अंदाज चुकू शकतो आणि त्याला रिकाम्या हाती परतावे लागते. असाच काहीसा किस्सा एका जंगलात घडला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे एक रानमांजर बिबट्याला चकवा देऊन पळ काढण्यात यशस्वी होते, ती गोष्ट खरंच पाहण्यासारखी आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जंगलातील असल्याचे दिसत आहे, जिथे एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकत आहे, त्यावेळी त्याची नजर एका रानमांजरीवर (civet cat) पडते. तो तिची शिकार करण्यासाठी योजना आखू लागतो. पण व्हिडिओच्या शेवटी मात्र त्याच्यासोबत असे काही घडते, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. कारण व्हिडिओच्या शेवटी, बिबट्याचे सारे नियोजन निष्फळ ठरते आणि रानमांजर तेथून पळ काढण्यात यशस्वी होते. पाहा व्हिडीओ-

सुरुवातीला बिबट्या झाडावर बसलेला असतो. त्याला रानमांजर दिसते. तो दबक्या पावलांनी तिचा मागोवा घेतो आणि तिच्यावर हल्ला करण्यासाठी योजना ठरवतो. पण रानमांजरीला त्याची चाहूल लागते. ती आधी झुडुपांत लपते आणि नंतर संधी साधून रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजुच्या झुडुपांत जाते. महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा रानमांजरीच्या पाठीमागे बिबट्या समोरच्या झुडुपांत जातो, तेव्हा तिथे आणखी एक बिबट्या शिकारीसाठी बसलेला असतो, त्यामुळे रानमांजर अधिकच सावध होते आणि पळून जाण्यात यशस्वी ठरते. आणि अखेर दोन्ही बिबट्यांना मात्र रिकाम्या हाती परतावे लागते.

Web Title: leopard stalks civet cat in jungle hunting see what happens next viral video trending social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.