...आणि त्यानंतर तो कधीच भूंकला नाही; बिबट्याने अक्षरश: दोर तोडून फरपटत नेलं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 17:15 IST2020-12-08T16:48:16+5:302020-12-08T17:15:20+5:30

Trending Viral News in Marathi : यावेळी बिबट्याने माणसांना नाही कुत्र्याला शिकार बनवून त्याचा जीव घेतला आहे.

leopard attack on pet dog incident at igatpuri in nashik | ...आणि त्यानंतर तो कधीच भूंकला नाही; बिबट्याने अक्षरश: दोर तोडून फरपटत नेलं, पाहा व्हिडीओ

...आणि त्यानंतर तो कधीच भूंकला नाही; बिबट्याने अक्षरश: दोर तोडून फरपटत नेलं, पाहा व्हिडीओ

बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागातून समोर येत असतात. अनेकदा बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात माणसांना जीवसुद्धा गमवावा लागतो. कधी घरात, तर कधी शाळेत बिबट्या शिरल्याच्या घटना काही नवीन नाहीत. अशाच एका धक्कादायक घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी बिबट्याने माणसांना नाही कुत्र्याला शिकार बनवून त्याचा जीव घेतला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद  झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील वाघोबाच्या वाडीत ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही फुटांच्या अंतरावर या बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे.

बबन झोले या घराजवळ अचानक  बिबट्या आला. पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर भुंकायला सुरूवात केली. कुत्र्याच्या आवाजामुळे बिबट्या त्याच्या अंगावर चाल करून आला. पाळीव कुत्रा बांधलेला असल्यामुळे त्याला कुठे पळ काढता आला नाही. त्यामुळे बिबट्याने हल्ला करून त्यांचा जागीच जीव घेतला.  कुत्रा जागेवर ठार झाल्यानंतर त्याला खेचून नेण्याचा बिबट्याने प्रयत्न सुरू केला. पण, झाडाच्या खोडाला बांधलेला असल्यामुळे बिबट्याकडून कुत्रा काही पुढे खेचला जात नव्हता. Video : मानवी वस्तीत शिरताच वाघाने केलं 'असं' काही; कधीही पाहिला नसेल असा वाघ

आपली सगळी ताकद लावत कुत्र्याला खेचण्याचा प्रयत्न बिबट्याने केला.  कुत्र्याला फरपटत नेत खाऊन फस्त केलं. ही थरारक घटना कॅमेरात कैद  झाली असून गावातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. कुत्र्याच्या मरणानंतर सोशल मीडियावरसुद्धा या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली  जात आहे. Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही

 

Web Title: leopard attack on pet dog incident at igatpuri in nashik