लेडीज रॉक्स! साऊथ इंडियन गाण्यावर तरूणींचा धमाल डान्स, बघून लोकांनीही ठरला ठेका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:24 IST2024-12-12T13:24:06+5:302024-12-12T13:24:55+5:30
Dance Viral Video : एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात काही तरूणी एका साऊथ इंडियन गाण्यावर धमाल डान्स करत आहेत.

लेडीज रॉक्स! साऊथ इंडियन गाण्यावर तरूणींचा धमाल डान्स, बघून लोकांनीही ठरला ठेका!
Dance Viral Video : सोशल मीडियावर रोज डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीना काही वेगळं बघायला मिळतं. हे व्हिडीओ बघून लोक एन्जॉयही करतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ असेही असतात जे बघून लोकांना एनर्जी सुद्धा मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात काही तरूणी एका साऊथ इंडियन गाण्यावर धमाल डान्स करत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, काही तरूणींचा ग्रुप डान्स सुरू आहे. सगळ्या एकत्र एका साऊथ इंडियन गाण्यावर धमाल डान्स करत आहेत. गाण्याचं म्युझिक इतकं जबरदस्त आहे की, तरूणी पूर्ण एनर्जीने डान्स करत आहेत. डान्स आणि म्युझिक इतकं जबरदस्त आहे की, बघता बघता तुम्हीही डान्स करायला लागाल.
Ek dance esa bhi viral hai 🫣😂 pic.twitter.com/gVsHr64oBU
— Kamal (@KamalSingh77749) December 9, 2024
हा व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @KamalSingh77749 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक लाइक्स मिळाले आहेत. यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने लिहिलं की, 'हा जेसीबी डान्स आहे'. दुसऱ्याने लिहिलं की, 'लेडीज मस्त डान्स करत आहेत'.