#koalachallenge चा सोशल मीडियात धुमाकूळ, ऑस्ट्रेलियातील लोकांच्या मदतीसाठी आगळंवेगळं चॅलेन्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 11:53 IST2020-01-13T11:52:48+5:302020-01-13T11:53:54+5:30

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली किती भयंकर होती हे आपण सर्वांनीच पाहिलंय. अनेक प्राण्यांना यात आपला जीव गमवावा लागला आहे.

Koalachallenge Australia bushfire donations videos goes viral | #koalachallenge चा सोशल मीडियात धुमाकूळ, ऑस्ट्रेलियातील लोकांच्या मदतीसाठी आगळंवेगळं चॅलेन्ज!

#koalachallenge चा सोशल मीडियात धुमाकूळ, ऑस्ट्रेलियातील लोकांच्या मदतीसाठी आगळंवेगळं चॅलेन्ज!

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली किती भयंकर होती हे आपण सर्वांनीच पाहिलंय. अनेक प्राण्यांना यात आपला जीव गमवावा लागला आहे. अशात आता लोक मदतीसाठी समोर येत आहेत. मदतीसाठी म्हणून सोशल मीडियात काही लोकांना एक चॅलेन्ज सुरू केलंय. खासकरून फिटनेससंबंधित लोक हे चॅलेन्ज पूर्ण करत आहेत.

#koalachallenge असं या चॅलेन्जचं नाव असून लोक सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करत आहेत. यात तुम्हाला कोआला प्राण्यासारखं एका टेबलाला लटकायचं आहे.

FITFAID ही कंपनी फिटनेससंबंधी काही पेय तयार करते. त्यांनी दावा केला आहे की, जे लोक हे चॅलेन्ज घेतील आणि पूर्ण करतील. यात तुम्हाला #koalachallenge लिहून व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करायचा आहे. जे हा व्हिडीओ शेअर करतील त्यांच्याकडून कंपनी ऑस्ट्रेलियातील आग पीडितांसाठी ५ डॉलरची मदत करेल.


Web Title: Koalachallenge Australia bushfire donations videos goes viral