VIDEO : बाथरूमध्ये शिरला खतरनाक किंग कोब्रा, व्यक्तीने दरवाजा उघडला आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:50 IST2022-04-01T14:48:07+5:302022-04-01T14:50:01+5:30
King Cobra Viral Video : किंग कोब्रा सामान्यपणे छोटे प्राणी, पक्षी किंवा इतर साप खातो. जोपर्यंत ते उत्तेजित होत नाही तोपर्यंत ते मनुष्यांना दंश मारत नाहीत.

VIDEO : बाथरूमध्ये शिरला खतरनाक किंग कोब्रा, व्यक्तीने दरवाजा उघडला आणि मग....
King Cobra Viral Video : जगातील सर्वात विषारी साप किंग कोब्रा सर्व सापांमध्ये सर्वात लांब असतात. एका वयस्क किंग कोब्राची लांबी १० ते १२ फूट आणि वजन २० पाउंड असू शकतं. जेव्हा किंग कोब्रा फणा काढून उभा राहतो तेव्हा भलभल्यांची हालत खराब होते. किंग कोब्रा सामान्यपणे छोटे प्राणी, पक्षी किंवा इतर साप खातो. जोपर्यंत ते उत्तेजित होत नाही तोपर्यंत ते मनुष्यांना दंश मारत नाहीत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मोठा किंग कोब्रा एका व्यक्तीच्या घरात शिरला होता. तो अशा जागी जाऊन लपतो जिथे त्याला शोधणं अवघड होतं. किंग कोब्रा घरातील बाथरूमध्ये शिरतो. कारण तिथे त्याला थंडावा मिळतो. घरातील सदस्याने जरा दरवाजा उघडला तेव्हा समोर दिसलेला भला मोठा किंग कोब्रा पाहून ते हैराण झाले.
किंग कोब्रा तिथून बाहेर पडण्यासाठी इकडे-तिकडे फिरतो आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या शरीरावर टॉयलेट पेपरही गुंडाळला गेला आहे. अशात तो बाहेर येऊन घरात दुसरीकडे घुसू नये व्यक्ती बाथरूमचा दरवाजा बंद करतो.
सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ snake_unity नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला अपलोड केल्यावर काही तासातच शेकडो लाइक्स आणि ५५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्सही करत आहेत.