अरेच्चा! चिमुकल्याच्या छोट्या कारनं खेचली वडिलांची मोठी गाडी; बापलेकाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 16:09 IST2020-11-17T16:09:12+5:302020-11-17T16:09:48+5:30
Viral News in Marathi : सोशल मीडिया युजर्स या चिमुकल्याचे कौतुक करत आहेत.

अरेच्चा! चिमुकल्याच्या छोट्या कारनं खेचली वडिलांची मोठी गाडी; बापलेकाचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला आणि त्याचे वडिल आपापल्या कारसह उभे आहेत. सोशल मीडिया युजर्स या चिमुकल्याचे कौतुक करत आहेत. @RexChapman या सोशल मीडिया युजरने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Dad of the year... pic.twitter.com/0wd9onU45R
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) November 16, 2020
आतापर्यंत १६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. ९ हजारांपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला वडिल आणि मुलाचे प्रेम दिसून येईल.
'डॅड ऑफ द इयर' असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. बॅटरीवर चालत असलेल्या लहानश्या कारने हा चिमुरडा बाबांची गाडी खेचलीआहे. आपल्या मुलाच्या आनंदासाठी बाबांना मुलाला कार खेचू देत आहेत. ३२ सेंकदांच्या या व्हिडीओनं लोकांना वेड लावले आहेत. सोशल मीडिया युजर्स या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ
वडिल आणि मुलाच्या नात्यातील प्रेम या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हे दोघेजण फिरायला निघाले असताना गंमत म्हणून या चिमुरड्याने आपल्या छोट्याश्या गाडीने वडिलांची गाडी खेचण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाच्या आनंदासाठी वडिलांनी गाडी चालवली. यानंतर चिमुरड्याच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा आहे. बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....