'या' चिमुकल्याने आर्मीची गाडी पाहताच जे केलं, ते पाहुन तुमचंही हृदय हेलावेल....पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 19:40 IST2021-10-25T12:25:42+5:302021-10-25T19:40:54+5:30

एका चिमुकल्याने जे केले ते पाहुन तुमचं देशप्रेम अधिक वाढेल आणि या चिमुकल्याचा अभिमानही वाटेल. चिमुरड्याचा सैन्याप्रती असलेला सन्मान पाहून कोणालाही अभिमान वाटेल. 

kid saluting Indian Army's vehicle video goes viral on social media | 'या' चिमुकल्याने आर्मीची गाडी पाहताच जे केलं, ते पाहुन तुमचंही हृदय हेलावेल....पाहा व्हिडिओ

'या' चिमुकल्याने आर्मीची गाडी पाहताच जे केलं, ते पाहुन तुमचंही हृदय हेलावेल....पाहा व्हिडिओ

तुम्ही कोण आहात? काय करता? तुमचं वय काय आहे यावरुन तुमच्या मनात देशाविषयी किती प्रेम आहे हे ठरत नाही. याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.  यात एका चिमुकल्याने जे केले ते पाहुन तुमचं देशप्रेम अधिक वाढेल आणि या चिमुकल्याचा अभिमानही वाटेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका चिमुरडा आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत रस्ता क्रॉस करताना दिसत आहे. यादरम्यान त्याने सैन्याची (Indian Army) गाडी पाहिली आणि तेथेच थांबला. काही वेळानंतर त्याने सैन्याच्या जवानांना सॅल्यूट केला. चिमुरड्याचा सैन्याप्रती असलेला सन्मान पाहून कोणालाही अभिमान वाटेल. 

ट्विटरवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बंगळुरू विमानतळावरील (Bangalore Airport) आहे. यापूर्वी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तामे सैन्याच्या जवानांसह राष्ट्रगीत गाताना एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ इंडियन आर्मी यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. जो खूप व्हायरल झाला होता. आता हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Web Title: kid saluting Indian Army's vehicle video goes viral on social media