Kevin Pietersen: रस्त्यावर धावणाऱ्या 'त्या' तरुणाचे केविन पीटरसनने केले कौतुक, Video शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 14:39 IST2022-03-21T14:39:10+5:302022-03-21T14:39:40+5:30
Kevin Pietersen: सोशल मीडियावर रात्री बारा वाजता धावत घरी जाणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. केविन पीटरसनने तो व्हिडिओ रिशेअर करत त्या तरुणाचे कौतुक केले.

Kevin Pietersen: रस्त्यावर धावणाऱ्या 'त्या' तरुणाचे केविन पीटरसनने केले कौतुक, Video शेअर करत म्हणाला...
नोएडा- सोशल मीडियावर सध्या प्रमोद मेहरा या युवकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचीच मने जिंकली आहेत. रात्री 12 वाजता रस्त्यावर धावणाऱ्या तरुणाचा संवाद अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. दिग्दर्शक विनोद कापरी यांनी व्हिडिओ शूट आणि शेअर केला आहे. दरम्यान, या तरुणाने इंग्लडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनलाही भुरळ पाडली आहे. पीटरसनने व्हिडिओ शेअर करत त्या तरुणाचे कौतुकही केले आहे.
This will make your Monday morning! What A Guy! 🤍🙏🏽 https://t.co/RLknfAsCKE
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 21, 2022
पीटरसनने व्हिडिओ शेअर करत लिहिले, ''हे पाहून तुमची सोमवारची सकाळ चांगली जाईल. काय मुलगा आहे!'' हा व्हिडिओ दिग्दर्शक विनोद कापरी यांनी शूट आणि शेर केला आहे. कापरी गाडी चालवत असताना त्यांना एक मुलगा रस्त्याने धावताना दिसला. त्यांना वाटले की या मुलाला काही अर्जंट काम असेल. पण, त्या मुलाला काही अर्जंट काम नसून, तो दररोज रात्री घरापर्यंत असाच धावतो. मुलाने कापरी यांना सांगितले की, त्याला भारतीय सैन्यात जायचे आहे, सकाळी त्याला वेळ मिळत नाही, म्हणून तो रात्री धावत घरी जातो आणि यादरम्यान सरावही करतो.
प्रदीप मेहता यांच्या मेहनतीला सलाम
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे नाव प्रदीप मेहता असून तो उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी आहे. त्या तरुणाने सांगितले की, त्याची आई रुग्णालयात दाखल आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत. तो नोएडामध्ये मोठ्या भावासोबत राहतो. तो आणि त्याचा भाऊ नोकरी करुन घर चालवतात.
मोठ्या भावासाठी जेवणही बनवतो
त्या तरुणाने सांगितले की, त्याचा मोठा भाऊ नाईट ड्युटी करतो, त्यामुळे त्यालाच भावासाठी जेवण बनवावे लागते. तो रात्री धावत घरी जातो आणि जेवण बनवतो. प्रदीप मेहताची मेहनत पाहून सगळेच त्यांना सलाम करत आहेत. हा व्हिडिओ खरोखरच खूप सकारात्मक उर्जेचा स्रोत आहे, म्हणूनच केविन पीटरसनने तो त्याच्या चाहत्यांसाठी रिशेअर केला आहे. पीटरसन अनेकदा अशा पोस्ट शेअर करत असतो. भारतात त्याचा खूप मोठे चाहता वर्ग आहे.