शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

Donation: मंत्र्याचा दानशूरपणा! किडनी प्रत्यार्पणासाठी रुग्णाला थेट सोन्याचे ब्रेसलेट दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 11:55 IST

केरळ राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आर बिंदू यांनी रूग्णाला आपल्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट दान केले आहे.

नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावरकेरळचेमंत्री आर बिंदू खूप चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या दानाच्या कार्यामुळे प्रत्येकजण त्यांचे कौतुक करत आहे. केरळ राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आर बिंदू यांनी समाजाला माणुसकीचे एक चांगले उदाहरण दिलं आहे. बिंदू यांनी एका रूग्णालयाला भेट दिली असता तेथील एका रूग्णाकडे किडनी प्रत्यार्पण करण्यासाठी पैसे नव्हते असे त्यांच्या निदर्शनास आले. ही बाब समजताच बिंदू यांनी संबंधित रूग्णाला मदत देण्याचे ठरवले आणि त्यांनी तिथेच आपल्या हातात असलेले सोन्याचे ब्रेसलेट काढून रूग्णाला दिले ज्यामुळे तो आपला उपचाराचा खर्च भागवू शकेल. 

दरम्यान, केरळचे उच्च शिक्षणमंत्री एका बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते. तिथे त्यांची भेट एका २७ वर्षीय रूग्णासोबत झाली जो आर्थिक समस्येचा सामना करत होता. त्याच्याकडे आपली किडनी प्रत्यार्पणासाठी देखील पैसे नव्हते, हे समजताच मंत्री बिंदू यांनी पैसे न देता आपल्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट रूग्णाला दान केले. या सर्व प्रकाराची सर्वत्र चर्चा रंगली असून प्रत्येकजण मंत्र्याच्या दानशूरपणाचा चाहता झाला आहे.

मंत्र्याने जिंकली मनं सोशल मीडियावर ही घटना खूप व्हायरल होत आहे. याप्रकरणाची ज्यांना ज्यांना माहिती होत आहे ती सर्वमंडळी मंत्री साहेबांची प्रशंसा करत आहे. मंत्री असावा तर असा अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. तर मदत छोटी असो की मोठी त्याला महत्त्व नसून मदतीला महत्त्व असल्याचे सोशल मीडियावरील युजर्स म्हणत आहेत. केरळ राज्याचे उच्च शिक्षणमंत्री बिंदू यांनी आपल्या या कृत्याने अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांनी दाखवलेल्या माणुसकीतून इतर राजकारण्यांना एक धडा देण्याचे काम केले आहे. जनतेचा सेवक कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे रूग्णालयातील काही रूग्णांनी सांगितले. सर्वच मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नसतात, अनेक मंत्री आपल्या पदाचा योग्य वापर करून जनतेच्या मनात जागा निर्माण करतात याचे हे ताजे उदाहरण आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाKeralaकेरळministerमंत्री