नवरदेवाची जुगाड एंट्री; ट्रॅक्टरवाल्या जेसीबीतून लग्नमंडपात, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:17 IST2024-01-25T14:15:41+5:302024-01-25T14:17:22+5:30
व्हायरल व्हिडिओत नवरदेव हा जुगाडवाल्या ट्रॅक्टर-जेसीबीत बसल्याचं दिसून येत आहे.

नवरदेवाची जुगाड एंट्री; ट्रॅक्टरवाल्या जेसीबीतून लग्नमंडपात, व्हिडिओ व्हायरल
लग्नात नवरदेव हा घोड्यावरुन येतो, ही सर्वसाधारण पद्धत आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेत आहे. मात्र, अलिकडच्या काळात हटके स्टाईल नवरदेवाची एंट्री करण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येते. अनेकदा नवरदेव अलिशान कारमधूनही लग्नमंडपात एंट्री करतात, किंवा त्यांची वरात निघत असते. तर, अलिकडे हेलिकॉप्टरमधून नवरदेव आणि नवरीची एंट्री होताना दिसून येते. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून नवरदेवाने चक्क जेसीबीतून एंट्री केल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हायरल व्हिडिओत नवरदेव हा जुगाडवाल्या ट्रॅक्टर-जेसीबीत बसल्याचं दिसून येत आहे. जेसीबीच्या लोडरमध्येच नवरदेव डोक्यावर फेटा बांधून उभा असल्याचं पाहायला मिळते. तर, खालून नातवाईक, पै-पाहुणे आणि मित्रकंपनी नवरदेवाला न्याहाळताना दिसून येतात. काहीजण नवरदेवाची अशी एंट्री पाहून हसतही आहेत.
सोशल मीडियात नेहमीच हटके गोष्टी व्हायरल होत असतात, आता इंस्टाग्रामवरील @ck_official_555 या अकाऊंटवरुन हा नवरदेवाचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर युजर्संच्या अनेक मजेशीर कमेंट येत आहेत.