अबब! संतापलेला गजराज थेट JCB ला भिडला, अशी टक्कर दिली की...पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:57 IST2025-02-03T19:56:20+5:302025-02-03T19:57:05+5:30

JCB vs Elephant : सोशल मीडियावर हत्ती आणि JCB च्या लढाईचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

JCB vs Elephant angry Elephant collided with JCB, Watch Video | अबब! संतापलेला गजराज थेट JCB ला भिडला, अशी टक्कर दिली की...पाहा Video

अबब! संतापलेला गजराज थेट JCB ला भिडला, अशी टक्कर दिली की...पाहा Video

JCB vs Elephant : हत्ती अतिशय शांत प्राणी आहे. म्हणूनच त्याला इंग्रजीत 'जेंटल जायंट' म्हणतात. पण, हाच हत्ती कधी रागावला, तर त्याच्यासमोर कुणाचेच चालत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात संतापलेला हत्ती एका JCB शी लढताना दिसतोय. हत्ती इतक्या जोरात टक्कर मारतो की, अवाढव्य आकाराची JCB उडून पडते. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे अजून समजलेले नाही. 

नेमकं काय घडलं?
व्हिडिओमध्ये काही लोकांचा जमाव आणि एक जेसीबी मशीन हत्तीचा पाठलाग करताना दिसते. अशा स्थितीत संतापलेला हत्ती अचानक वळतो आणि जेसीबीला जोरदार धडक देतो. ही धडक इतकी जोराची असते की, JCB काही क्षण उचलली जाते. यानंतर हत्ती तिथून पुढे निघून जातो. लोकांचा जमाव इथेच थांबत नाही, तर ओरडत हत्तीच्या मागे धावू लागतात. JCB देखील हत्तीच्या मागे धावते. यावेळी बरेच लोक व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत.


व्हिडिओला कोट्यवधी व्ह्यू
हा व्हिडिओ 2 फेब्रुवारी रोजी @sujandutta.pc._lover_ या Instagram हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता, ज्याला 12.1 मिलियनहून अधिक व्ह्यू आणि 3 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करताना JCB vs Elephant कॅप्शन दिले होते. यासोबतच पाच हजारांहून अधिक युजर्सनी विविध कमेंट्स केल्या आहेत. 
 

Web Title: JCB vs Elephant angry Elephant collided with JCB, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.