बापरे...! स्टंट दाखवण्याच्या नादात मगरीच्या जबड्यात हात घालणं पडलं महागात; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:59 IST2022-12-23T15:52:00+5:302022-12-23T15:59:13+5:30
man put his hand in crocodiles jaw see what happened while showing stunt video

बापरे...! स्टंट दाखवण्याच्या नादात मगरीच्या जबड्यात हात घालणं पडलं महागात; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल
मगरीचे अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी त्यांचे लोकांवर हल्ला करतानाचे, तर कधी पाण्याखालचे व्हिडिओ समोर येत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हडिओमध्ये, एका व्यक्तीने स्टंट दाखवताना मगरीच्या जबड्यात हात घातला आणि मगरीने हल्ला करत तिचा हात पकडला. यानंतर, ती व्यक्ती कशीबशी तडफड करून मगरीच्या तावडीतून सुटल्याचे दिसत आहे.
आधीपासूनच उघडा होता जबडा -
हा व्हिडिओ एका युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पाण्याने भरलेल्या एका पूलच्या बाजूला ही स्टंटबाजी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे त्या मगरीचा जबडा आधीपासून उघडा आहे. ही संपूर्ण घटना एखाद्या शो दरम्यान घडल्याचे दिसत आहे. सर्वप्रथम संबंधित व्यक्ती त्या मगरीजवळ गेल्यानंतर, एका स्टिकच्या सहाय्याने मगरीचा जबडा चेक करते. मात्र, यानंतर ती व्यक्ती एकदमच तिचा हात मगरीच्या जबड्यात घालते. सुरुवातीला मगर काहीच प्रतिक्रिया देत नाही. मात्र, नंतर जे घडले ते थरकाप उडवणारे आहे.
स्टंटमॅन तडफडू लागला अन्...
या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, त्या व्यक्तीने आपला हात मगरीच्या जबड्यात घातल्यानंतर, मगरीने हल्ला केला आणि तिचा हात पकडला. यानंतर कशी बशी धडपड करून त्या व्यक्तीने मगरीच्या जबड्यातून आपला हात सोडवला. या व्यक्तीच्या हातातून रक्त उडतानाही दिसत आहे. यानंतर ती व्यक्ती तेथून लगेच निघून गेली.