कॅफे आहे की 'वसुली भाई'; ज्या गोष्टीसाठी गॅसची गरज नाही, त्यावरही घेतले ५ टक्के Gas Crisis शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 16:51 IST2026-03-16T16:50:01+5:302026-03-16T16:51:32+5:30

गॅस टंचाईमुळे रेस्टॉरंट आणि कॅफे व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे. पण, या संकट काळात वसुलीचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. एक बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ते वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.

Is it a cafe or 'Vasuli Bhai'; 5 percent Gas Crisis fee is charged even on things that do not require gas | कॅफे आहे की 'वसुली भाई'; ज्या गोष्टीसाठी गॅसची गरज नाही, त्यावरही घेतले ५ टक्के Gas Crisis शुल्क

कॅफे आहे की 'वसुली भाई'; ज्या गोष्टीसाठी गॅसची गरज नाही, त्यावरही घेतले ५ टक्के Gas Crisis शुल्क

बंगळुरूतील एका कॅफेचे बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात कॅफेने ५ टक्के गॅस संकट शुल्क आकारल्याचे स्पष्ट उल्लेख केला आहे. पण, कळस म्हणजे ज्या गोष्टीसाठी गॅसची गरजच लागत नाही, त्यावर हे शुल्क घेण्यात आले आहे. त्यामुळेच हे बिल बघून अनेकजण डोक्याला हात मारून घेत आहेत. 

हे बिल ज्या कॅफेचे आहे, त्याचे नाव आहे थियो कॅफे. या कॅफे ब्रॅण्ड्ची बऱ्याच ठिकाणी आउटलेट्स आहेत. कोथनूरमधील या कॅफेचे बिल एका सोशल मीडियावरून पोस्ट करण्यात आले. हे बिल पोस्ट करताना व्यक्तीने म्हटलंय लिंबूपाण्यावर गॅस क्रायसिस चार्ज. 

व्यक्तीने कॅफेमध्ये लिंबूपाणी मागवले. त्याला बिल देण्यात आले. १७९ रुपयांच्या लिंबूपाण्यावर त्याला ५ टक्के म्हणजे १७.०१ रुपये गॅस क्रायसिस शुल्क आकारण्यात आले. 

हे बिल बघून लोकही अवाक् होत आहेत. कारण लिंबूपाणी बनवण्यासाठी गॅसची गरजच नसते. मग कॅफेने ५ टक्के शुल्क कसे घेतले, असा प्रश्न सगळे विचारत आहेत. लिंबूपाणी बनवण्यासाठी कोणता गॅस लागतो? असा प्रश्न एकाने केला आहे.

एकाने म्हटले आहे की, आता पुढे काय? बंगळुरू आता हवामान बदलाचेही शुल्क घेणार आहे का?, दुसऱ्या एकाने म्हटलेय की, लिंबू गॅसवर गरम करून टाकला की काय? 

Web Title : बेंगलुरु कैफे का नींबू पानी पर 'गैस संकट' शुल्क वायरल

Web Summary : बेंगलुरु के थियो कैफे ने नींबू पानी पर 5% 'गैस संकट' शुल्क लगाया, जिससे ऑनलाइन आक्रोश फैल गया। ग्राहकों ने तर्क पर सवाल उठाया, क्योंकि नींबू पानी में गैस की आवश्यकता नहीं होती है। बिल वायरल हो गया, जिससे भविष्य के शुल्क के बारे में हास्यपूर्ण प्रतिक्रियाएं आईं।

Web Title : Bengaluru Cafe's Outrageous 'Gas Crisis' Charge on Lemonade Goes Viral

Web Summary : A Bengaluru cafe, Theo Cafe, charged 5% 'Gas Crisis' fee on a lemonade, sparking outrage online. Customers questioned the logic, as lemonade requires no gas. The bill went viral, prompting humorous reactions about future charges.