नशेत घाबरलेली तरूणी म्हणाली - काका, मला सेफ घरी पोहोचवा...कॅब ड्रायव्हरने जे केलं पाहून कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:04 IST2025-12-30T16:00:17+5:302025-12-30T16:04:40+5:30
Kolkata Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डॅशकॅम फुटेजमध्ये एक कॅब ड्रायव्हर नशेत असलेल्या महिला प्रवाशाला पूर्ण काळजी आणि सुरक्षिततेने घरी पोहोचवताना दिसतो.

नशेत घाबरलेली तरूणी म्हणाली - काका, मला सेफ घरी पोहोचवा...कॅब ड्रायव्हरने जे केलं पाहून कराल कौतुक
Kolkata Viral Video : कोलकातामधील एका साध्या उशिरा रात्रीच्या कॅब प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. कारण या व्हिडिओमध्ये ना कुणाचं भांडण आहे, ना डान्स आहे ना वाद आहे. ती फक्त एका कॅब ड्रायव्हरची जबाबदारी आणि माणुसकी, ज्याने लोकांची मनं जिंकली आणि आजही चांगली माणसं आहेत हे सिद्ध केलं.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डॅशकॅम फुटेजमध्ये एक कॅब ड्रायव्हर नशेत असलेल्या महिला प्रवाशाला पूर्ण काळजी आणि सुरक्षिततेने घरी पोहोचवताना दिसतो. प्रवासादरम्यान ड्रायव्हर शांत, संयमी आणि फारच जबाबदार वागतो. तर महिला आपल्या अवस्थेमुळे घाबरलेली दिसते.
व्हिडिओमध्ये महिला म्हणताना ऐकू येते की, “अंकल, प्लीज मला सुरक्षित घरी पोहोचवा, मी खूप नशेत आहे.” यावर ड्रायव्हर अगदी साधेपणाने उत्तर देतो की, “मी आहे ना, मी तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवेन.”
तो तिला सतत धीर देतो आणि प्रेमाने “बेटा” म्हणत शांत राहायला सांगतो. प्रवासादरम्यान महिलेच्या आईचा फोन येतो. महिला ड्रायव्हरला फोन देते आणि तो थेट तिच्या आईशी सुद्धा बोलतो. तो सांगतो की त्यांची मुलगी सुरक्षितपणे घरी जात आहे. एवढंच नाही तर, आईची चिंता कमी व्हावी म्हणून तो आपली लाईव्ह लोकेशनही शेअर करतो.
This is Kolkata ♥️
— নক্ষত্র | Nakshatra ❁ (@BombagorerRaja) December 28, 2025
A cab driver calmly ensured a drunk woman reached home safely, with dignity untouched.
Moments like these explain why Kolkata repeatedly emerges as India’s Safest City, while many other 'double engine' metro cities lag behind. pic.twitter.com/zbTGH7oc9c
महिला उशिरा घरी गेल्यावर आई रागावेल असं म्हणते, तेव्हा ड्रायव्हर गमतीत तिला म्हणतो, “रागावलं पाहिजे, तुम्ही फार नखरे करताय.” या उत्तरामुळे वातावरण हलकं होतं आणि ड्रायव्हरची आपुलकीची भावना स्पष्टपणे दिसून येते.
राईड संपल्यानंतरही ड्रायव्हर केवळ भाडं घेऊन निघून जात नाही. तो गेट उघडून देण्यात महिलेची मदत करतो आणि ती सुरक्षितपणे घरात जाईपर्यंत तिथेच थांबतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक ड्रायव्हरचं भरभरून कौतुक करत आहेत.