शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या माइलस्टोनवर चिकटवले जातीचे स्टिकर! पर्यटकाचा लडाखमध्ये निर्लज्ज स्टंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:34 IST

लडाखमध्ये मैलाच्या दगडावर स्टिकर चिकटवणाऱ्या थार चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Social Viral: साहसी पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या लडाखमध्ये एका पर्यटकाच्या उद्धटपणाने नवा वाद निर्माण केला आहे. लेह-श्रीनगर महामार्गावरील सर्वात उंच ठिकाण मानल्या जाणाऱ्या फोटु ला पासवर  बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अधिकृत मैलाच्या दगडावर स्वतःच्या जातीचा स्टिकर चिकटवणाऱ्या हरियाणाच्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर पर्यटकांच्या वागण्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

नेमकी घटना काय?मंगळवारी, २० जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक १० सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये एक तरुण आपल्या महिंद्रा थार गाडीतून १३,४७९ फूट उंचीवर असलेल्या फोटु ला टॉपवर पोहोचलेला दिसतो. तिथे पोहोचल्यानंतर त्याने बीआरओने बसवलेल्या मैलाच्या दगडावर गुर्जर असे लिहिलेले स्टिकर चिकटवले. इतकेच नाही, तर कॅमेऱ्यासमोर हसत आणि अभिमानाने ही कृती करताना तो व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान 

बीआरओद्वारे तयार करण्यात आलेले हे मैलाचे दगड आणि दिशादर्शक फलक केवळ माहिती देण्यासाठी नसतात, तर दुर्गम सीमा भागात रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या जवानांच्या बलिदानाचे प्रतीक मानले जातात. अशा संवेदनशील क्षेत्रातील मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा मानला जातो. पर्यटकाने हा व्हिडिओ एखाद्या मोठ्या कामगिरीसारखा सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांचा पारा चढला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणाच्या गाडीचा क्रमांक शोधून काढला. धक्कादायक बाब म्हणजे, या पर्यटकाच्या वाहनावर यापूर्वीच ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल १८ चालान प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून हा पर्यटक सराईतपणे नियम पायदळी तुडवणारा असल्याचे स्पष्ट होत आहे.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले, "इतक्या उंचीवर जाऊन त्याने आपण किती मोठे मूर्ख आहोत हे जगाला दाखवून दिले आहे." तर दुसऱ्याने संताप व्यक्त करत, "अशा लोकांना एक महिना बीआरओचे रस्ते आणि फलक साफ करण्याची शिक्षा द्यायला हवी," असे म्हटले. लडाख पोलीस आणि संबंधित यंत्रणा आता या व्हिडिओच्या आधारे संबंधित व्यक्तीवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tourist defaces Ladakh milestone with caste sticker, sparks outrage.

Web Summary : A tourist from Haryana sparked outrage in Ladakh by sticking a caste sticker on a Border Roads Organisation milestone at Fotu La pass. The act, filmed and shared online, damaged public property and disrespected sacrifices. The tourist has multiple traffic violations and faces potential legal action.
टॅग्स :ladakhलडाखSocial Viralसोशल व्हायरल