एक जोडपं इन्स्टाग्रामवर एवढं फेमस आहे की, ते फक्त इन्स्टाग्रामरून सहा आकड्यांमध्ये कमाई करतात. ब्रिटनमध्ये राहणारा जॅक मोरिस आणि ऑस्ट्रेलियातील लॉरेन बुलेन ट्रॅव्हल ब्लॉगर असून दोघंही क्रमशः 27 लाख आणि 21 लाख इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

काही दिवसांपूर्वीच या जोडप्याने बालीमध्ये आपलं एक सुंदर घर बांधलं आहे. 

डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, या जोडप्याने फक्त इन्स्टाग्रामवरून केलेल्या कमाईतूनच हे आलिशान घर उभारलं आहे. यासाठी या दोघांनी एक वर्षा अगोदरच जमिन खरेदी केली होती. 

जॅक यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, मी कधीच विचार केला नव्हता की, माझ्या स्वप्नातल्या मुलीसाठी मी माझ्या घरापासून दूर 7000 मैल अंतरावर एक घर तयार करेल. 29 वर्षांच्या जॅकने सांगितले की, त्याने स्पॉन्सरशिप डील आणि इन्स्टाग्रामवर ब्रँडेड कन्टेनमार्फत ही कमाई केली आहे. 

याआधी कपलने असं सांगितलं होतं की, ते 2 लाख रूपयांपेक्षा कमी प्राइजसाठी स्पॉन्सर्ड पोस्ट अजिबात करणार नाहीत. एवढचं नाहीतर जॅखने जवळपास 6 लाख रूपयांसाठी एक सॉन्सर्ड पोस्ट केली आहे. एवढचं नाहीतर लॉरेनला एका पोस्टसाठी अधिकाधिक 5 लाख रूपये दिले आहेत. 

इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हल ब्लॉगर होण्याआधी जॅक एका फोन कंपनीसाठी काम करत होता. कपलने नवीन मेन्शनमध्ये लग्जरी पूल, सिनेमा स्क्रिन आमि सुंदर किचन तयार केलं आहे. जॅकने घराच्या डिझाइनचं संपूर्ण क्रेडीट गर्लफ्रेंड लॉरेनला दिलं आहे. 

पाहा यांचे आणखी काही सुंदर फोटो...

Web Title: Instagram travel bloggers earn six figure salary build mansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.