Bride Groom Funny Video Instagram Reel :  भर मंडपात, चार चौघात नवरीने प्रश्न टाकला, का करायचंय लग्न? वराच्या उत्तराने सारेच झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 08:43 IST2022-05-12T08:42:17+5:302022-05-12T08:43:12+5:30

​​​​​​​Bride Groom Funny Video Instagram Reel:  नववधूने कॅमेऱ्यासमोरच वराला एक प्रश्न विचारला, ज्यामुळे तो आधी काही सेकंदांसाठी अवाक् झाला. मात्र, नंतर वराने वधूच्या प्रश्नाला अतिशय मजेशीर उत्तर दिलं.

instagram reel video bride asked why do you want to get married hearing the answer of groom people start laughing watch | Bride Groom Funny Video Instagram Reel :  भर मंडपात, चार चौघात नवरीने प्रश्न टाकला, का करायचंय लग्न? वराच्या उत्तराने सारेच झाले अवाक्

Bride Groom Funny Video Instagram Reel :  भर मंडपात, चार चौघात नवरीने प्रश्न टाकला, का करायचंय लग्न? वराच्या उत्तराने सारेच झाले अवाक्

Bride Groom Funny Video Instagram Reel:  लग्नसोहळ्याच्या निमित्ताने वधू-वरांचे अनेक मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांकडूनही अशा व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडूनही या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसतेय.

या व्हिडीओमध्ये वधूने कॅमेऱ्यासमोर वराला असा प्रश्न विचारला, ज्यामुळे तो प्रथम थोडा चक्रावून गेला. मात्र, नंतर वराने वधूच्या प्रश्नाला अतिशय मजेशीर उत्तर दिलं. वधूने वराला विचारलेला प्रश्न ऐकून तेथे उपस्थित नातेवाईक आणि पाहुणे गोंधळून गेल्याचे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. तो काय उत्तर देतो हे पाहण्यासाठी लोक वराकडे पाहू लागले.


यानंतर वराने वधूला खूप गमतीशीर उत्तर दिले, जे ऐकून वधूनंही बोलणं बंद केलं आणि ती स्तब्धच राहिली. नवरीनं मंडपात वराला तुला लग्न का करतोय? असा प्रश्न सर्वांसमोर विचारला. पहिलं तर वराच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि नंतर त्यानं उत्तर देताना म्हटलं की, मला शांतता नकोय. वराकडून मिळालेलं हे उत्तर ऐकून वधूलाही यावर काय प्रत्युत्तर द्यावं हे सूचलं नाही. वराचं हे ऐकून सर्व पाहुणे आणि नातेवाईक जोरजोरात हसू लागले.

इंस्टाग्रामवर व्हिडीओ झाला व्हायरल
हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर prashanth_bionic नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही पसंती दिली असून लाखो लोकांनी हा व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहे. या व्हिडीओवर (Instagram Reels Video) नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.

Web Title: instagram reel video bride asked why do you want to get married hearing the answer of groom people start laughing watch