आई ती आईच! दोन चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन Zomato ची डिलिव्हरी पोहोचवतेय महिला; Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 20:58 IST2022-08-22T20:58:35+5:302022-08-22T20:58:57+5:30
सोशल मीडियावर सध्या अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होतोय.. Zomato साठी जेवणाची डिलिव्हरी करणारी ही महिला कामावरही आपल्या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन फिरत असल्याचा हा व्हिडीओ आहे.

आई ती आईच! दोन चिमुकल्या मुलांना सोबत घेऊन Zomato ची डिलिव्हरी पोहोचवतेय महिला; Video Viral
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.... हे उगाच म्हटलं जात नाही. आपल्या लेकरांवर आई जेवढं प्रेम करते, तेवढं कुणीच करत नसावं... त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो लेकरांसाठी आई खंबीरपणे उभी राहते... सोशल मीडियावर सध्या अशाच एका आईचा व्हिडीओ व्हायरल होतोय.. Zomato साठी जेवणाची डिलिव्हरी करणारी ही महिला कामावरही आपल्या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन फिरत असल्याचा हा व्हिडीओ आहे. यात तिने एका मुलीला बेबी बॅगमध्ये बसवून आपल्या उराशी कवटाळले आहे, तर दुसरा मुलगा तिला डिलिव्हरी करण्यासाठी मदत करतोय... या दोन्ही मुलांना सोबत घेऊन ही महिला ऊन-पाऊस विसरून कर्तव्य कर्तव्य बजावतेय...
ब्लॉगर सौरव पंजवानी यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आणि बघताबघता तो तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओत पंजवानी त्या महिलेला विचारले असता तिने सांगितले की जेवणाची डिलिव्हरी करताना मी माझ्या मुलीला सोबतच घेऊन फिरते आणि मला मुलगाही मला मदत करतो. यावर पंजवानी यांनी लिहिले की, हे पाहून मी खूप प्रेरित झालो. ही महिला संपूर्ण दिवस आपल्या मुलांसोबत घालवते. आपल्याला जे हवंय, त्यासाठी काही करण्याची तयारी असायला हवं. हे या महिलेकडून शिकायला हवं.''
व्हायरल झालेला हा व्हिडीओ Zomato पर्यंत पोहोचला आणि त्यांनी पंजवानी यांच्याकडे त्यांनी केलेल्या ऑर्डरची माहिती मागवली. जेणेकरून या महिलेची माहिती त्यांना मिळेल आणि ते तिला मदत करू शकतील.