आनंद महिंद्रांना सापडला खराखुरा आर्यन मॅन, स्वत: जाऊन घेणार भेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 05:36 PM2021-09-24T17:36:20+5:302021-09-24T17:39:50+5:30

उद्योगपती आनंद महिंद्रा एका मुलाचं टॅलेंट त्यांनी सर्वांसमोर आणलं आहे. आपल्याला खरा आर्यन मॅन सापडला असं त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर त्याला स्वतः प्रत्यक्षात भेटण्यासाठीही ते उत्सुक आहेत. 

Industrialist Anand Mahindra tweets video of student who created iron man suit video goes viral | आनंद महिंद्रांना सापडला खराखुरा आर्यन मॅन, स्वत: जाऊन घेणार भेट...

आनंद महिंद्रांना सापडला खराखुरा आर्यन मॅन, स्वत: जाऊन घेणार भेट...

Next

उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आपल्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ शेअर केला जो पाहून ते स्वतः खूप इम्प्रेस झाले आहेत (Anand Mahindra tweet) . एका मुलाचं टॅलेंट त्यांनी सर्वांसमोर आणलं आहे. आपल्याला खरा आर्यन मॅन सापडला असं त्यांनी सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर त्याला स्वतः प्रत्यक्षात भेटण्यासाठीही ते उत्सुक आहेत. 

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ Brut. चा आहे. यामध्ये सांगितल्यानुसार मणिपूरच्या हिरोकमध्ये राहणाऱ्या प्रेम निनगोमबम (Prem Ningombam)  या मुलाने आयर्न मॅनचा सूट बनवला आहे. त्याने खराब इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करून हा सूट तयार केला आहे. त्याने आयर्न मॅन फिल्म पाहिली त्यानंतर आयर्न मॅन सूट तयार करण्याचा विचार केला. २०१५साली त्याने असा सूट तयार करायचं ठरवलं.  व्हिडीओत प्रेम सांगतो की, मी जेव्हा मुव्ही पाहिली तेव्हा ती टेक्नॉलॉजी पाहून मी खूप आश्चर्यचकित झालो.

व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार प्रेमला चित्रकलेची आवड आहे. आयर्न मॅनचा सूट तयार करण्यासाठी त्याने कोणतं विशेष प्रशिक्षण घेतलेलं नाही. हॉलिवूड फिल्म आणि इंटरनेटवरून त्याने माहिती मिळवली. पण त्याच्याकडे यासाठी पैसेही नव्हतं. त्याला कष्ट करून आपलं पोट भरणाऱ्या आईवर याचा भार टाकायचा नव्हता. पण त्याची आई नेहमी त्याच्या सोबत असायची. तुला जे करायचं आहे, ते कर मी तुला मदत करेन असं सांगायची. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढायचा.  यानंतर त्याने खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कार्डबोर्ड जमा केले आणि त्याने आयर्न मॅनच्या सूटवरील हेल्मेट बनवलं.

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे की, हा मुलगा टोनी स्टार्कच्याही पुढे निघून गेला. रिअल आयर्न मॅनसाठी शक्षणाचा मार्ग बनवायला हवा. याच्या आणि याच्या भावंडांच्या शिक्षणासाठी मला पुढाकार घ्यायचा आहे. कुणी मला याच्याशी संपर्क करवून दिला तर त्याला @KCMahindraEduc1 मार्फत मदत दिली जाईल.

Web Title: Industrialist Anand Mahindra tweets video of student who created iron man suit video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app