बाप रे बाप डोक्याला ताप! टीव्ही मालिकेतील हे लग्न पाहून हेच म्हणाल - अरे आवरा ह्यांना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 14:16 IST2021-03-27T13:50:54+5:302021-03-27T14:16:36+5:30

सोशल मीडियावर एका यूजरने एक मालिकेतील एक क्लिप शेअर केली आहे. ज्यात एका कपलचं चुकून लग्न होतं. पण ही चूक इतकी नाटकीय आहे की, लगेच मनात येतं की, अरे यांना आवरा....!

Indian tv shows dramatic accidental Shaadi plot video clip goes viral | बाप रे बाप डोक्याला ताप! टीव्ही मालिकेतील हे लग्न पाहून हेच म्हणाल - अरे आवरा ह्यांना!

बाप रे बाप डोक्याला ताप! टीव्ही मालिकेतील हे लग्न पाहून हेच म्हणाल - अरे आवरा ह्यांना!

लग्न तर तुम्ही अनेक पाहिले असतील. पण भारतीय टीव्ही मालिकेतील या Accidental लग्नाबाबत लोक चांगलेच कन्फ्यूज झाले आहेत. त्यांना हे कळत नाहीये की, नेमकं असं होऊ कसं शकतं? सोशल मीडियावर एका यूजरने एक मालिकेतील एक क्लिप शेअर केली आहे. ज्यात एका कपलचं चुकून लग्न होतं. पण ही चूक इतकी नाटकीय आहे की, लगेच मनात येतं की, अरे यांना आवरा....!

ही व्हिडीओ क्लिप ट्विटर यूजर @Shayonnita15 ने २५ मार्चला शेअर केली होती. आतापर्यंत या व्हिडीओ क्लिपला ६० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर शेकडो यूजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी ड्रेसिंग टेबलसमोर बसली आहे. तिथे अचानक एक तरूण येतो  आणि टेबलवरील कुंकवाच्या डबीतील कुंकू त्याच्या शर्टच्या बाहीत अडकतं. आता तो केस करताना त्याच्या बाहीतील कुंकू तरूणीच्या भांगेत पडतं. 
 

 

Web Title: Indian tv shows dramatic accidental Shaadi plot video clip goes viral