थायलंडच्या 'वॉकिंग स्ट्रीट'वर राडा; भारतीय पर्यटकाला ट्रान्सजेंडर महिलांकडून बेदम मारहाण; पैसे देण्यावरुन घडला वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:05 IST2026-01-05T14:16:51+5:302026-01-05T16:05:31+5:30
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

थायलंडच्या 'वॉकिंग स्ट्रीट'वर राडा; भारतीय पर्यटकाला ट्रान्सजेंडर महिलांकडून बेदम मारहाण; पैसे देण्यावरुन घडला वाद
Thailand Transgender Attack:थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पटाया शहरात एका ५२ वर्षीय भारतीय पर्यटकाला ट्रान्सजेंडर महिलांच्या गटाने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पैशांच्या वादातून हा राडा झाल्याचे सांगण्यात येत असून, या मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहेत. तीन ते चार ट्रान्सजेंडर महिलांनी भारतीयावर हल्ला करुन त्याला मारहाण केली.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पटायामधील प्रसिद्ध वॉकिंग स्ट्रीट परिसरात ही घटना घडली. राज जसुजा असे जखमी भारतीय पर्यटकाचे नाव आहे. एका ट्रान्सजेंडर सेक्स वर्करसोबत राज जसुजा यांचा पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर बघता बघता हाणामारीत झाले. जसुजा यांनी पैसे देण्यास नकार देऊन कारमधून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता, ट्रान्सजेंडर महिलांच्या गटाने त्यांना कारबाहेर खेचले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
रक्ताच्या थारोळ्यात पर्यटक
या घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका १९ वर्षीय स्थानिक तरुणाने सांगितले की, सुरुवातीला जसुजा आणि एका ट्रान्सजेंडर महिलेमध्ये पैशांवरून जोरदार वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकमेकांचा पाठलाग करत एकमेकांना मारले. थोड्याच वेळात त्या ट्रान्सजेंडर महिलेचे इतर साथीदार तिथे पोहोचले आणि त्यांनी मिळून जसुजा यांना घेरले. यात जसुजा यांच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. बचाव पथकाने त्यांना घटनास्थळी प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पैशांचा वाद की अन्य काही?
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ठरलेली पूर्ण रक्कम न दिल्याने हा वाद उफाळून आला होता. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलिसांनी सांगितले की, राज जसुजा यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांची औपचारिक तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. थाई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबावरून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
#watch The pervert who goes abroad and brings shame to the country
— Mukund Shahi (@Mukundshahi73) January 3, 2026
"An Indian thrashed in Thailand." A 52-year-old Indian Raj Jasuja, who refused to pay for "services," was beaten by a group of transwomen in Thailand.
As per reports, he has been hospitalized at Pattaya Memorial pic.twitter.com/K10jR0tKBz
भारतीय पर्यटक वारंवार निशाण्यावर
पटायामध्ये भारतीय पर्यटकांवर हल्ल्याच्या घटनांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबरमध्ये एका भारतीय पर्यटकाने अयोग्य स्पर्श केल्याच्या आरोपावरून ट्रान्सजेंडर महिलेने त्याला मारहाण केली होती. ऑक्टोबरमध्ये ३ ट्रान्सजेंडर महिलांनी हॉटेलमध्ये दोन भारतीयांवर हल्ला करून २४,००० बात (सुमारे ६९,००० रुपये) लुटले होते.