घे चुना अन् मळ दणादणा...भारतीय तरुणाने परदेशी तरुणाला तंबाखू खायला शिकवंल; पाहा ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 16:42 IST2023-04-17T16:40:42+5:302023-04-17T16:42:52+5:30
युंगाडन तरुणाने थेट परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनाच ट्विट केलं.

घे चुना अन् मळ दणादणा...भारतीय तरुणाने परदेशी तरुणाला तंबाखू खायला शिकवंल; पाहा ट्विट
Social Media Viral: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे कोणालाच माहीत नाही. कधी कधी अशा गोष्टी व्हायरल होतात, ज्या पाहून तुम्ही पोट धरुन हसता. सध्या अशीच एक घटना व्हायरल होत आहे. एका युगांडन तरुणाचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका भारतीय तरुणाने त्याला चुना लावून तंबाखू खाण्यास शिकवल्याचा दावा त्या व्यक्तीने आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
I worked with this Indian guy for 3months. He taught me how to eat tobacco mixture with white coloured flour-like things(ssuna) It was damn cool. He was like a brother to me. pic.twitter.com/zJfJKFUE5H
— TheycallmeAgaba 🇺🇬 (@mac_agaba) April 11, 2023
आठवडाभरापूर्वी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युगांडामध्ये सौरऊर्जेवर चालणाऱ्या पाणीपुरवठा यंत्रणेचे उद्घाटन केले होते. याबाबतचा एक व्हिडिओही त्यांनी आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. यातील एका प्रतिक्रियीने सर्वांचेच मनोरंजन केले.
या ट्विटला उत्तर देताना अगाबा नावाच्या सोशल मीडिया यूजरने ट्विट केले. या ट्विटमध्ये अगाबाने एका मुलासोबतचा तिचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना अगाबाने लिहिले की, मी या भारतीय व्यक्तीसोबत 3 महिने काम केले. त्याने मला चुना लावून तंबाखू खायला शिकवले. तो अनुभव खूप भारी होता. दरम्यान, त्याचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.
अगाबाचे हे ट्विट पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. नेटकऱ्यांनी त्याच्या या ट्विटवर विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत. लोकां प्रतिसादात खूप मजा आली. ट्विटवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. पहा...