हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांनी बनवला 'कडक चहा', सियाचिनमधील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:36 IST2025-11-12T14:55:23+5:302025-11-12T15:36:44+5:30
Indian Army Soldiers Viral Video : या व्हिडिओमध्ये सैनिक गोठलेल्या दूधाच्या पॅकेटमधून चहा बनवत आहेत आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. हीच त्यांची खरी ताकद आणि जिद्द दाखवते.

हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय जवानांनी बनवला 'कडक चहा', सियाचिनमधील व्हिडीओ व्हायरल
Indian Army’s video goes viral: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, जो सियाचिनचा असल्याचं सांगितलं जातंय. येथे तापमान इतकं कमी असतं की दूध सुद्धा गोठून जातं. अशा परिस्थितीत भारतीय जवानांना ‘कडक चहा’ बनवण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. या व्हिडिओमध्ये सैनिक पॅकेटमध्ये गोठलेल्या दूधाचा चहा बनवत आहेत आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. हीच त्यांची खरी ताकद आणि जिद्द दाखवते.
सियाचिनच्या भीषण थंडीत सर्वकाही बर्फात बदललेलं असतं. श्वाससुद्धा धुरासारखा दिसतो. पण तरीही हे जवान थंडीला हरवत, गॅस पेटवतात, गोठलेलं दूध वितळवतात आणि आनंदाने चहा तयार करतात. हे फक्त एक पेय नाही, तर त्यांचं धैर्य, मेहनत आणि मनोबलाचं प्रतीक आहे.
लोकांचा भावनिक प्रतिसाद
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, “आपण उबदार बिछान्यात झोपलो आहोत, आणि ते आपल्यासाठी या थंडीत लढत आहेत.” दुसऱ्याने म्हटलं, “हा व्हिडीओ आपल्याला भावूक करण्यासाठी नाही, तर आठवण करून देण्यासाठी आहे की ते तिथे आपल्या साठी आहेत. जय हिंद!”
हा फक्त ‘चहा’ नव्हे, तर ती कथा आहे त्या सैनिकांच्या जिद्दीची आणि देशभक्तीची, जे प्रत्येक ऋतूत देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असतात. बर्फात गोठलेल्या दूधाचा चहा बनवणं छोटं वाटू शकतं, पण सियाचिनसारख्या ठिकाणी ते शौर्याचं प्रतीक आहे.