तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 15:46 IST2025-09-26T15:41:27+5:302025-09-26T15:46:15+5:30

IND vs PAK Final Funny Memes Asia Cup 2025: बांगलादेश हरवून पाकिस्तान अंतिम फेरीत भारताशी भिडणार

ind vs pak final asia cup 2025 funny memes viral after pakistan reach finals against india | तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस

तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस

IND vs PAK Final Funny Memes Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ मध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाने सुपर-४ च्या सामन्यात बांगलादेशला ११ धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. आता रविवारी पाकिस्तानचा संघ भारताशी विजेतेपदाच्या लढतीत भिडणार आहे. ही स्पर्धा सुरु झाली तेव्हा भारताने पाकिस्तानशी खेळण्यास नकार द्यायला हवा, असा सूर सर्वत्र दिसून येत होता. पण भारतीय संघ पाकिस्तानशी खेळला आणि जिंकला. त्यावेळी भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यात नकार दिल्याने बराच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सुपर-४ मध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला पराभूत केले. त्यावेळी पाकिस्तानचा फरहान याचे AK47 सेलिब्रेशन आणि हॅरिस रौफचे आक्षेपार्ह हातवारे चर्चेत राहिले. अखेर हो-नाही म्हणता म्हणता भारत आणि पाकिस्तान एकाच स्पर्धेत चक्क तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले आहे.

आशिया कप स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत आमनेसामने येत आहेत. याचदरम्यान, सध्या सोशल मीडियावर भरपूर मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. पाहूया त्यापैकी काही भन्नाट मीम्स...

----

----

----

दरम्यान, अंतिम सामन्याबाबत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने आशियाई क्रिकेट परिषदेला इशारा दिला आहे की जर भारत जिंकला तर तो मोहसिन नक्वी यांच्याहस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाही. मोहसिन नक्वी हे केवळ पीसीबीचे अध्यक्ष नाहीत तर आशियाई क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते आशिया कपच्या फायनलमध्ये विजेत्याला ट्रॉफी सादर करतील. काही काळापासून अशी चर्चा आहे की जर टीम इंडियाने आशिया कप जिंकला तर ते मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. आता, सूर्यकुमार यादव यांनी एसीसीला स्पष्ट संदेश दिला आहे की जर त्यांनी अंतिम सामना जिंकला तर ते नक्वींकडून चषक स्वीकारणार नाहीत. यावर अद्याप काहीही अपडेट मिळालेली नाही.

Web Title : भारत बनाम पाकिस्तान फाइनल: मजेदार मीम्स ने पाकिस्तान का उड़ाया मजाक

Web Summary : भारत और पाकिस्तान एशिया कप के फाइनल में भिड़ेंगे, टूर्नामेंट में तीसरी बार। पाकिस्तान की सुपर-4 जीत के बाद सोशल मीडिया पर मीम्स की बाढ़। 41 वर्षों में पहली बार फाइनल में मुकाबला।

Web Title : India vs Pakistan Final: Hilarious Memes Mock Pakistan's Cricket Team

Web Summary : India and Pakistan face off in the Asia Cup final, their third clash in the tournament. Social media explodes with memes after Pakistan's Super-4 win. This marks the first time in 41 years they meet in the final.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.