Virat Kohli Chinese Fan, Viral Video: विराट कोहलीच्या चायनीज फॅनची झक्कास हिंदी, व्हिडीओ पाहणारे अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 16:23 IST2022-11-03T16:15:08+5:302022-11-03T16:23:27+5:30

मूळचा चायनीज असलेला हा चाहता ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतोय

IND vs BAN viral video virat kohli chinese fan will leave you stunned after listening to fluent hindi | Virat Kohli Chinese Fan, Viral Video: विराट कोहलीच्या चायनीज फॅनची झक्कास हिंदी, व्हिडीओ पाहणारे अवाक्

Virat Kohli Chinese Fan, Viral Video: विराट कोहलीच्या चायनीज फॅनची झक्कास हिंदी, व्हिडीओ पाहणारे अवाक्

Virat Kohli Chinese Fan, Viral Video: भारताने बांगलादेशवर टी२० विश्वचषक सामन्यात विजय मिळवला आणि सेमीफायनल मधील प्रवेश जवळपास निश्चित केला. मात्र सध्या या सामन्यापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक चायनीज चाहता साऱ्यांची मनं जिंकताना दिसतोय. त्याच्या भावना कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाला भिडणाऱ्या आहेत. चीनमधून आलेला कोहलीचा हा चाहता भारतावर खूप प्रेम करतो आणि तो फक्त कोहलीसाठी हा सामना पाहण्यासाठी आला आहे, असे म्हणताना व्हिडीओत ऐकू येते. गंमत म्हणजे हा चायनीज हे सगळं अस्खलित हिंदीत बोलताना दिसतो.

विराट कोहलीचा हा चायनीज चाहता एडिलेड विद्यापीठात भाषा विषयाचा विद्यार्थी आहे. त्याला भारतीय संस्कृतीची खूप आवड आहे आणि याच प्रेमामुळे तो स्वतःहून हिंदी शिकला आहे. त्याची ही क्लिप व्हायरल होत असून कोहलीचा हा चाहता अस्खलित हिंदीत आपले म्हणणे मांडत आहे. पाहा व्हिडीओ-

तो चाहता म्हणाला, की तो टीम इंडियाचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याला भारतीय संस्कृती फार आवडते. यानंतर जेव्हा या व्यक्तीला टीम इंडियामध्ये कोण आवडते असे विचारले, तेव्हा त्याने विराट कोहलीचे नाव घेतले. 'मला खात्री आहे की भारतीय संघ बांगलादेशला सहज हरवेल,' असेही त्या फॅनने आधीच सांगितले होते.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर @DrVivekBindra या हँडलसह व्हिडिओ शेअर करताना युजरने कॅप्शन दिले आहे, 'विराट कोहलीच्या या चायनीज फॅनची जबरदस्त हिंदी तुम्हाला थक्क करेल.' अवघ्या ४१ सेकंदांची ही क्लिप इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत.

Web Title: IND vs BAN viral video virat kohli chinese fan will leave you stunned after listening to fluent hindi