शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

Viral Video: व्हिडिओ पाहून उत्तर द्या कसं गायब झालं ९ पैकी १ झाकण? ९९ टक्के लोकांनी दिलं चुकीचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:27 IST

एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक गणितीय कोडं नेटिझन्सना दिलं गेलं आहे. हे कोडं सोडवताना ९९ टक्के नेटिझन्सचं उत्तर चुकीचं येत आहे.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) कोडं (Puzzle) किंवा अवघड प्रश्नांविषयीचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल होताना दिसत आहेत. भास निर्माण करणारं चित्र, कोडं किंवा गणिताविषयीचे प्रश्न नेटिझन्सना विचारून कमेंटमध्ये उत्तर देण्यास सांगितलं जात आहे. यातले प्रश्न अवघड असल्यानं बहुतांश युझर्सचं उत्तर चुकत असल्याचं दिसून येतं.

काही व्यक्ती मुळातच अभ्यासात हुशार असतात. त्यामुळे कितीही अवघड प्रश्न असला तरी ते त्याचं अचूक उत्तर देतात. शिक्षकदेखील अशा विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देताना दिसतात; मात्र प्रत्येक विद्यार्थ्याचं टॅलेंट (Talent) वेगवेगळं असतं. अनेकांना गणितीय आकडेमोड जमत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरचे गणिताशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी अनेकांना बराच वेळ लागतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक गणितीय कोडं नेटिझन्सना दिलं गेलं आहे.

हे कोडं सोडवताना ९९ टक्के नेटिझन्सचं उत्तर चुकीचं येत आहे. अर्थात यामागे ऑप्टिकल इल्युजन नंबर्स (Optical Illusion Numbers) हे कारण आहे. यात एखादी वस्तू समोर असूनही ती दिसत नाही. तुमचे डोळे अनेकदा एखादी वस्तू सहज बघू शकत नाहीत, हे कारण त्यामागे असतं.

सध्या एक शॉर्ट व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. हा व्हिडिओ काही सेकंदांचा असला तरी त्यातलं कोड सोडवण्यासाठी नेटिझन्स कित्येक तास मोबाइलवर घालवत आहेत. या व्हिडिओमधला एक प्रश्न नेटिझन्सना कोड्यात टाकत आहे. कोल्ड्रिंक (Cold Drink) पिणं सगळ्यांनाच आवडतं. कोल्ड्रिंकच्या बाटलीचं झाकण (Cap) लहान मुलं खेळण्यासाठी वापरतात. या झाकणाचा वापर व्हिडिओतल्या कोड्यामध्ये केला गेला आहे.

या व्हिडिओत सुरवातीला नऊ झाकणं मोजली जातात. परंतु, व्हिडिओतली व्यक्ती अतिशय बेमालूमपणे हातातली स्टिक (Stick) इकडून तिकडे हलवते आणि त्यानंतर केवळ आठ झाकणं असल्याचं दिसतं. नऊ झाकणं असताना आठच कशी दिसतात, हा प्रश्न नेटिझन्सना (Netizens) कोड्यात टाकतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरही एक झाकण कुठे गायब झालं हे नेटिझन्सना समजू शकत नाही. त्यामुळे अनेक नेटिझन्स या (Mathematical) कोड्याचं चुकीचं उत्तर कमेंटमध्ये देत आहेत; मात्र त्यामागे सोपी पद्धत वापरली गेली आहे.

हा सगळा आभासी खेळ आहे. व्हिडिओतली व्यक्ती जेव्हा स्टिक इकडून तिकडं हलवते, तेव्हा मध्यभागी असलेल्या एका झाकणावर त्यातलं दुसरं एक झाकण ठेवलं जातं. त्यामुळे एक झाकण गायब झालं आहे, असं व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीला वाटतं. ही गोष्ट इतकी सफाईदारपणे केली गेली आहे, की एक झाकण कसं गायब झालं हे समजणं खूपच कठीण आहे. त्यामुळेच ९९ टक्के नेटिझन्सनी या कोड्याचं उत्तर चुकीचं दिलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामJara hatkeजरा हटके