नापास झाल्यानं टेन्शन आलेलं, मग मित्रही नापास झाल्याचं कळताच चिमुकला खूश झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 14:16 IST2024-12-08T14:15:13+5:302024-12-08T14:16:18+5:30
चिमुकला स्वतः नापास झालाच, पण मित्रही नापास झाल्याचे खळखळुन हसला.

नापास झाल्यानं टेन्शन आलेलं, मग मित्रही नापास झाल्याचं कळताच चिमुकला खूश झाला
Social Media Viral Video : सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल, तर तुम्ही ते व्हायरल व्हिडिओ आणि फोटो पाहू शकता. आता अशाच प्रकारचा आगळावेगळा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. शिवाय, तुमच्या जिगरी मित्राचीही आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपण परीक्षेत नापास झाल्याचे सांगतोय. नापास झाल्याने मला टेंशन आलं होतं, पण माझा मित्र लुलेनदेखील नापास झाला. त्यामुळे आता माझं टेश्न थोडं कमी झालंय, असं तो मुलगा व्हिडिओमध्ये बोलतोय. म्हणजेच, त्या मुलाला स्वतः नापास झाल्याच्या दुःखापेक्षा, मित्र नापास झाल्याचा जास्त आनंद आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठे काढण्यात आला, याची माहिती मिळू शकली नाही, मात्र सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहा:-
Dosti ho toh aisi 😁 pic.twitter.com/SI0oWEOhtj
— Harsh (@harshch20442964) December 8, 2024
हा व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @harshch20442964 नावाच्या अकाउंटवर पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना 'मैत्री असावी तर अशी' असे कॅप्शन लिहिले आहे. वृत्त लिहेपर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहून एका यूजरने कमेंट केली - हो भाऊ, माझ्या मित्रालाही कमी मार्क मिळाल्यावर माझं टेन्शन थोडं कमी झालं होतं. तर, दुसऱ्या युजरने लिहिलं - आपण अयशस्वी झालो तर आपल्याला वाईट वाटतं, परंतु आपल्यासोबत इतर अपयशी झाले, तर आनंद वाटतो. आणखी एका यूजरने व्वा, काय मैत्री आहे, अशी कमेंट केली.