"सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी, हुंडा मी देईन...!" पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरूण; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 21:56 IST2023-01-24T21:54:39+5:302023-01-24T21:56:06+5:30
हे पोस्टर घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाकडे लोक चालता चालता थांबून बघत आहेत. या पोझिशनमधला त्याचा व्हिडिओही तयार करत आहेत. एवढेच नाही, तर सोशल मीडियावरही लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत.

"सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी, हुंडा मी देईन...!" पोस्टर घेऊन रस्त्यावर उभा राहिला तरूण; Video व्हायरल
छिंदवाडा - लग्नासाठी मुलगी शोधण्याकरता एका तरुणाने अनोखी पद्धत शोधून काढली. तो एक पोस्टर घेऊन थेट रस्त्यावरच उभा राहिला. "लग्नासाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी, हुंडा मी देईन," असे या पोस्टरवर लिहिले आहे. हा व्हिडिओ छिंदवाडा येथील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
हे पोस्टर घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाकडे लोक चालता चालता थांबून बघत आहेत. या पोझिशनमधला त्याचा व्हिडिओही तयार करत आहेत. एवढेच नाही, तर सोशल मीडियावरही लोक या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. महत्वाचे म्हणजे, या पोस्टरच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.
खरे तर आपल्या समाजात पालक लोक आपल्या मुलीच्या लग्नासाठी सरकारी नोकरी असलेल्या तरुणाला प्राधान्य देतात. पण या उलट छिंदवाड्यातील या तरुणाने चौकाचौकात उभे राहून सरकारी नोकरी असलेल्या मुलीचा शोध सुरू केला आहे. मला लग्नासाठी सरकारी नोकरी असलेली मुलगी हवी. हुंडा मी देईन, असे त्यांनी या पोस्टरवर लिहिले आहे. त्याने याचा व्हिडिओही शूट केला आहे. जो सोशल मीडियावरही पोस्ट करण्यात आला आहे. यावर यूजर्स विविध प्रकारच्या कमेंट्सदेखील करत आहेत.
फव्वारा चौकात तयार करण्यात आलाय हा व्हिडिओ -
संबंधित तरुणाने तयार केलेला हा व्हिडिओ छिंदवाडा येथील फवारा चौकातील आहे. या व्हिडिओत विकल्प मालवी असे नाव लिहिलेलेही दिसत आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, तरुणाने प्रसिद्धीसाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तेथून ये-जा करणारे लोक पोस्टर वाचत आहेत. या तरुणाच्या पोस्टरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. छिंदवाडा मध्यप्रदेशात आहे. याच बरोबर हे शरह महाराष्ट्राच्या सीमेला लागूनही आहे.