मला 'वेड' लागले मोबाईलचे; कैद्याच्या हाती बेड्या अन् पोलिसांच्या फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 18:06 IST2023-04-15T18:04:23+5:302023-04-15T18:06:22+5:30
माजी आयपीएस अधिकारी आरके विज नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हा फोटो शेअर करण्यात आला आहे

मला 'वेड' लागले मोबाईलचे; कैद्याच्या हाती बेड्या अन् पोलिसांच्या फोन
मुंबई - सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम संबंधितांवर होईल, हे सांगता येत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे एका माजी आयपीएस अधिकाऱ्यानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करत पोलिसांची मजा घेतलीय. पोलीस आणि कैदी यांच्यातील या घटनेचा प्रसंग या फोटोतून व्यक्त होत आहे. मात्र, मोबाईलच्या स्क्रीनवर आजकाल माणूस किती मग्न झालाय, हेही या फोटोतून दिसून येईल. त्यामध्ये, दोन पोलीस आणि एक कैदी मोबाईल पाहताना दिसून येतात.
माजी आयपीएस अधिकारी आरके विज नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'दक्षतेचा अभाव'. दरम्यान, हा फोटो नेटकऱ्यांचे चांगलच मनोरंजन करत आहे. अनेक नेटकऱ्यांनी फोटो खाली अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला आहे, तर अनेकजण यावर वेगवेगळे मीम्स बनवत आहेत. एका नेटीझन्सने फोटोसह मजेशीर कॅप्शन दिलंय.
सतर्कता में कमी pic.twitter.com/5vwTsKrwBi
— RK Vij (@ipsvijrk) April 14, 2023
गलती से भी राइफल का ट्रिगर दब जायेगा
तो बंदी हर बंधन से आज़ाद हो जायेगा
असे कॅप्शन ट्विटर युजर्सने दिले आहे. दरम्यान, या व्हायरल फोटो दोन पोलीस शिपाई एका गुन्हेगाराला घेऊन बाकावर बसले आहेत. त्यापैकी, एका एका शिपायाजवळ गुन्हेगार चिकटून बसला आहे. दोघेही एकाच मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहात आहेत. तर, दुसऱ्याच बाजुला दुसरे पोलीस शिपाई बसलेले दिसून येतात. विशेष म्हणजे त्यांचेही लक्ष मोबाईलमध्येच आहे. मात्र, गुन्हेगाराचा हातात बेड्या बांधल्या असून त्याचा ताबा पोलीस शिपायाच्या हाती आहे. या फोटोवरुन मजेशीर मिम्स बनवले जात आहेत. तर, पोलीस दलाला लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, व्हायरल फोटोमुळे माणूस मोबाईलच्या स्क्रीनवर किती व्यस्त झालाय, हे दिसून येते.