Viral Video : पती माझ्यासाठी गाणं गात नाही, पत्नी थेट पोलीस स्टेशनला पोहचली; पतीला बोलावलं, मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 16:39 IST2023-04-22T16:39:12+5:302023-04-22T16:39:54+5:30

याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Husband doesn t sing for me wife reaches police station directly video goes viral | Viral Video : पती माझ्यासाठी गाणं गात नाही, पत्नी थेट पोलीस स्टेशनला पोहचली; पतीला बोलावलं, मग..

Viral Video : पती माझ्यासाठी गाणं गात नाही, पत्नी थेट पोलीस स्टेशनला पोहचली; पतीला बोलावलं, मग..

पती-पत्नीमधील भांडणांचे व्हिडीओ तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. कधी-कधी पती पत्नीमधील भांडणं इतकी टोकाला जातात की, पोलीस ठाण्यात जाऊन मिटवले जातात. या सगळ्यामध्ये असाच एक भलता प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ऐकून पोलीसही हैराण झाले की. हे सुद्धा भांडणाचं कारण असू शकतं का असा त्यांनाच प्रश्न पडला. मात्र, नंतर पतीला बोलावून प्रकरण मिटवण्यात आलं. पत्नी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली असता हा सर्व प्रकार घडला.

दरम्यान, नुकताच याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक महिला तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती. आपला पती आपल्यासाठी गात नाही अशी तक्रार तिनं केली. तिची तक्रार ऐकून आधी पोलिसच आश्चर्यचकित झाले. त्यानंतर तिच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्याची पत्नी पोलीस ठाण्यात आली असून तिनं तक्रार दाखल केल्याचं त्याला सांगण्यात आलं.

पती पोलीस ठाण्यात
यानंतर पत्नीची समजूत काढताना पतीनं गाणं गायलं. यानंतर त्याची पत्नी खूश झाली. तसंच कोणीतरी या घटनेचा व्हिडीओही काढला. दरम्यान, पोलीस ठाण्यात त्यांच्यातील वाद मिटवला गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र हा व्हिडीओ केव्हाचा आहे याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली नाही.  

Web Title: Husband doesn t sing for me wife reaches police station directly video goes viral