Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:52 IST2025-12-12T14:50:59+5:302025-12-12T14:52:02+5:30
Video - एक पती आपल्या शिक्षिका असलेल्या पत्नीला तिच्या वरिष्ठ शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडतो.

Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. काही हसवणारे, काही आश्चर्यचकित करणारे आणि काही असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक पती आपल्या शिक्षिका असलेल्या पत्नीला तिच्या वरिष्ठ शिक्षकासोबत OYO हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडतो. यानंतर जो काही गोंधळ झाला, तो पाहून आजूबाजूचे लोकही हैराण झाले.
व्हायरल व्हिडीओ एक्स (X) वर @M__Rkhan नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला, त्यानंतर तो वेगाने व्हायरल होऊ लागला आणि लोकांनी त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओची सुरुवात रस्त्यावरील जोरदार गोंधळाने होते. रागात असलेला पती पत्नीला ओरडताना आणि मारहाण करतानाही दिसत आहे. तो वारंवार म्हणतो, "तुला अजिबात लाज वाटली नाही? तू OYO हॉटेलमध्ये गेली होतीस! मला सगळं कळलंय."
पति ने टीचर पत्नी को सीनियर टीचर के साथ ओयो
— @MR.Khan (@M__Rkhan) December 11, 2025
में रंगे हाथों पकड़ा,सड़क पर पत्नी की पिटाई पुलिस
ने मौक़े पर किया गिरफतार,ऐसे टीचर्स बच्चों को
क्या पढ़ाएंगे और क्या सं-स्कार देंगें,शर्मनाक😔😔 pic.twitter.com/QsKZJwT71f
पत्नी त्याच्यासमोर शांत उभी असते, तर पती सतत आरोप करत राहतो की ती तिच्या सीनियर शिक्षकासोबत हॉटेलमध्ये होती. लोकही हे पाहण्यासाठी थांबतात. अनेक जण मोबाईल काढून व्हिडीओ बनवू लागतात. थोड्या वेळाने पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आहे. नंतर पोलिसांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून पतीला ताब्यातही घेतलं.
व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. कोणी लिहिलं की, 'असे लोक मुलांना काय शिकवतील', तर कोणी म्हटले की, 'चूक कोणाची आणि बरोबर कोण हे तपासाचा विषय आहे, पण रस्त्यावर अशा प्रकारे मारहाण करणं पूर्णपणे चुकीचं आहे.' काही लोकांनी या घटनेला लज्जास्पद म्हटलं, तर काहींनी असे खासगी प्रकरणं सोशल मीडियावर पसरवू नयेत, असे मत व्यक्त केले. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देणं सुरू केलं.