Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:30 IST2025-12-26T18:28:48+5:302025-12-26T18:30:15+5:30
Husband and wife Video: कारमध्ये पेट्रोल भरताना पंपावरच जोडप्यामध्ये वाद सुरू झाला... वादाचे कारण ऐकल्यानंतर अनेकांनी डोक्याला मारला हात...

Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र सध्या उत्तर प्रदेशातील एका पती-पत्नीचा मजेशीर व्हिडिओ नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. पेट्रोल पंपावर लावलेल्या एका साध्या फलकामुळे एका जोडप्यामध्ये चांगलाच वाद रंगला आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तिथे लावलेल्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल – आपका जीवन है अनमोल’ या फलकाकडे महिलेचे लक्ष गेले. हे वाचताच तिने कार चालवत असलेल्या आपल्या पतीला विचारले की, “तुम्ही हेल्मेट का घातले नाही? हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही." पत्नीचे हे बोलणे ऐकून पती क्षणभर गोंधळला.
पतीने तिला समजावण्याचा प्रयत्न करत सांगितले की, "हा नियम केवळ दुचाकीस्वारांसाठी आहे, कार चालकांसाठी नाही. मात्र महिला आपल्या मुद्द्यावर ठाम राहिली. तिने फलक दाखवत विचारले, “फलकावर कुठे लिहिले आहे की, हा नियम फक्त दुचाकीसाठी आहे?” यानंतर पतीने हसत-हसत उत्तर दिले की, "तुला खूप भूक लागली आहे, म्हणून तुला काय बोलायचे आहे? हे समजत नाही" पतीच्या दिलेल्या उत्तरामुळे तिथे उपस्थित असलेले लोकही हसू आवरू शकले नाहीत.
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. एका युजरने लिहिले, “वाह सिमरन वाह, काय नॉलेज आहे!” तर दुसऱ्याने म्हटले, “आयुष्यात असंच मनोरंजन करणारे नाते हवे.” काही जणांनी मात्र महिलेला पाठिंबा देत प्रशासनाने फलकावर स्पष्टपणे हा नियम फक्त दुचाकीस्वारांसाठी आहे, असे नमूद करावे अशी मागणी केली आहे.