VIDEO : आग लागलेल्या इमारतीत अडकल्या होत्या दोन मुली, ६ लोकांनी असा वाचवला जीव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:27 IST2021-08-26T15:25:17+5:302021-08-26T15:27:22+5:30
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हुनान च्या Xintian मध्ये ही घडली. येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती.

VIDEO : आग लागलेल्या इमारतीत अडकल्या होत्या दोन मुली, ६ लोकांनी असा वाचवला जीव!
चीनमध्ये एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. या मजल्यावरील घरात दोन लहान मुली अडकल्या होत्या. अशात ६ लोकांनी एका ह्यमून चेन करून त्या मुलींना वाचवून लोकांचं मन जिंकलं. सोशल मीडियावरून या लोकांचं कौतुक केलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ज्यात ते मुलींचा जीव वाचवताना दिसत आहेत.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हुनान च्या Xintian मध्ये ही घडली. येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आणि दोन मुली वर अडकल्या होत्या. या स्थितीत सहा लोकांनी साहस दाखवलं आणि ह्यूमन चेन बनवून कोणत्याही सुरक्षा उपकरणाशिवाय मुलींचा जीव वाचवला.
हा व्हिडीओ Trending in China नावाच्या फेसबुक पेजवर २२ ऑगस्टला शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १९ हजार व्ह्यूज आणि ३०९ रिअॅक्शन मिळाले आहेत.
या व्हिडीओत शेवटी दोन फायरमॅन मदतीसाठी आल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक आपापली मतं मांडत आहेत. लोक भरभरून या मुलींचा जीव वाचवणाऱ्या लोकांचं कौतुक करत आहेत.