Video: दुर्बिणीचा शोध भारतातच लागला? होयसला मंदिरावरून ऑस्ट्रेलियन व्लॉगरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 17:28 IST2026-02-08T17:27:28+5:302026-02-08T17:28:36+5:30

Hoysala Temple Viral Video: कर्नाटकच्या होयसला मंदिरात ५०० वर्षांपूर्वीची दुर्बीण? ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हल व्लॉगरच्या दाव्याने सोशल मीडियावर चर्चा. सविस्तर वाचा.

Hoysala Temple Viral Video: Was the telescope invented in India? That carving in the Hoysala temple sparks discussions on social media; Australian vlogger claims | Video: दुर्बिणीचा शोध भारतातच लागला? होयसला मंदिरावरून ऑस्ट्रेलियन व्लॉगरचा दावा

Video: दुर्बिणीचा शोध भारतातच लागला? होयसला मंदिरावरून ऑस्ट्रेलियन व्लॉगरचा दावा

कर्नाटकच्या ऐतिहासिक होयसला मंदिरातील एका प्राचीन कोरीव कामाच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हल व्लॉगरने या मंदिरातील भिंतीवर 'दुर्बीण' सदृश वस्तू वापरणाऱ्या व्यक्तीचे कोरीव चित्र दाखवून एक नवा वाद आणि उत्सुकता निर्माण केली आहे.

ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हल व्लॉगर लियाम रिचर्ड्स याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, "इतिहासाच्या पुस्तकांनी आपल्याला पुन्हा एकदा खोटे सांगितले आहे. दुर्बिणीचा शोध १६०८ मध्ये नेदरलँडमध्ये लागला असे सांगितले जाते, परंतु या मंदिराच्या भिंतीवर हे कोरीव काम त्या शोधाच्या ५००-६०० वर्षांपूर्वीचे आहे."

कोरीव कामात काय दिसते? 
या व्हिडिओत एक छोटी मानवी आकृती हातात एक लांब नळीसारखी वस्तू धरून आकाशाकडे पाहत असल्याचे दिसते. लियाम रिचर्ड्सच्या मते, ती वस्तू दुर्बीणच आहे. या मंदिरामध्ये २०,००० पेक्षा जास्त कोरीव कामे आहेत आणि ही संस्कृती आपल्या काळापेक्षा खूप पुढे होती, असे त्याने नमूद केले आहे.



सोशल मीडियावर चर्चा
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक भारतीयांनी "आमचे पूर्वज विज्ञानात किती प्रगत होते, हे यातून सिद्ध होते," अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही इतिहासकारांच्या मते, हे केवळ योगायोग किंवा दुसरी कोणतीतरी वस्तू असू शकते. मात्र, या व्हिडिओने पुन्हा एकदा प्राचीन भारतीय विज्ञान आणि वास्तुकलेच्या रहस्यांवर प्रकाश टाकला आहे.

Web Title : क्या भारत में ही दूरबीन का आविष्कार हुआ? होयसल मंदिर की नक्काशी से विवाद।

Web Summary : होयसल मंदिर की एक नक्काशी, जो दूरबीन जैसी वस्तु का उपयोग करते हुए एक व्यक्ति को दर्शाती है, पर एक ऑस्ट्रेलियाई व्लॉगर के वीडियो ने बहस छेड़ दी है। कुछ का दावा है कि यह प्राचीन भारतीय वैज्ञानिक उन्नति को साबित करता है, जबकि अन्य संशय में हैं।

Web Title : Telescope discovered in India? Hoysala temple carving sparks debate.

Web Summary : An Australian vlogger's video of a Hoysala temple carving resembling a telescope user has ignited debate. Some claim it proves ancient Indian scientific advancement, while others remain skeptical.