चॅलेंज! या फोटोत किती आहेत बदक? ९९ टक्के लोकांनी मानली हार; तुम्हीही ट्राय करून बघा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 13:56 IST2022-01-14T13:47:25+5:302022-01-14T13:56:07+5:30
Social Viral : डेनिअल न्यूमॅन नावाच्या एका ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला. पहिल्यांदा तुम्ही फोटो बघाल तर तुम्हाला यात केवळ ९ बदकं असल्याचं दिसेल.

चॅलेंज! या फोटोत किती आहेत बदक? ९९ टक्के लोकांनी मानली हार; तुम्हीही ट्राय करून बघा....
Social Viral : जर थंडीने डोकं जरा जड झालं असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक डोक्याला चालना देणारं एक खाद्य घेऊन आलो आहोत. एक असा फोटो व्हायरल झाला आहे जो बघून तुम्ही चक्रावून जाल. या फोटो व्हायरल झाला असून लोक एकमेकांना चॅलेंज देत आहेत. चॅलेंज याचं आहे की, या फोटोत किती बदकं आहत हे ओळखायचं आहे. पण हे इतकं सोपं नाही, जेवढं तुम्हाला दिसतंय.
डेनिअल न्यूमॅन नावाच्या एका ट्विटर यूजरने हा फोटो शेअर केला. पहिल्यांदा तुम्ही फोटो बघाल तर तुम्हाला यात केवळ ९ बदकं असल्याचं दिसेल. पण जेव्हा तुम्ही लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला फोटोत आणखी काही छोटे बदक दिसतात. पण यात एकूण किती बदक आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे.
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. एका यूजरने लिहिलं की, 'मी मोजण्याचा प्रयत्न करणं सोडलं'. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, 'याने माझं डोकं चक्रावून गेलं आहे'. अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांना यात एकूण किती बदक आहेत हे सांगता आलं नाही.
किती आहेत बदक?
मुळात या फोटोत एकूण १६ बदकं आहे. ट्विटर यूजर कॅटी जूलियाने समजावलं. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'या फोटोत एकूण १६ बदकांचे इमोजी आहेत. ९ बदकं समोर दिसत आहेत आणि काही असे आहेत ज्यांवर मिनी इमोजी लपलेले आहेत. एक कपल बदक आहे. ज्यांच्यामागे एक बदक लपला आहे'.
हे पण वाचा :
काही रेल्वे स्टेशनच्या नावामागे जंक्शन तर काहींचा मागे टर्मिनस व सेंट्रल असते, असे का?