व्वा! नोकरी असावी तर अशी, एका दिवसात लाखो कमवा, तुम्ही एका महिन्यात करोडपती व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 19:50 IST2023-06-18T19:48:46+5:302023-06-18T19:50:07+5:30

या कामासाठी एका दिवसात १.२२ लाख रुपये मिळू शकतात.

horse grooming jobs make you earn lakhs of rupees | व्वा! नोकरी असावी तर अशी, एका दिवसात लाखो कमवा, तुम्ही एका महिन्यात करोडपती व्हाल

व्वा! नोकरी असावी तर अशी, एका दिवसात लाखो कमवा, तुम्ही एका महिन्यात करोडपती व्हाल

आपण नोकरी पैसे मिळवण्यासाठी करतो. अनेकांना  कमी वेळात जास्त पैसे मिळण्याची इ्च्छा असते.  आता जगात नोकऱ्यांचे स्वरूप बदलले आहे. कुठेतरी डेस्क जॉब आहे तर कुठे शेतात काम करावे लागेल. पण काही नोकऱ्या खूप विचित्र असतात, ज्यात पैसा खूप चांगला आणि जास्त मिळतो. हे काम घोड्यांचे केस कापण्याचे आहे, ज्यामध्ये तुम्ही दररोज लाखो रुपये कमवू शकता.

जर तुम्हाला घोडे आवडत असतील आणि त्यांना वाढवायला आवडत असेल तर ही नोकरी तुमच्यासाठी आहे. या नोकरीत तुम्ही फक्त घोड्यांसोबत वेळ घालवू शकणार नाही, तर तुमच्या खात्यात भरपूर पैसेही जमा होतील. एका अहवालानुसार, जगातील काही देशांमध्ये घोड्याच्या केसांच्या वेणीला खूप चांगले पैसे दिले जातात. या नोकरीमध्ये तुम्हाला घोडे पाळावे लागतील आणि एका दिवसात १.२२ लाख रुपये मिळू शकतात.

अनेक देशांमध्ये घोड्यांचे शो आयोजित केले जातात. तिथे त्यांच्या केसांची वेणी बनवली जाते. यासाठी लोकांना दर तासाला १५० डॉलर म्हणजेच १२ हजार रुपये मिळतात. जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही दररोज १० घोड्यांची वेणी लावू शकता. या प्राण्यांना दुबई, सौदी अरेबिया, कतार, इराण आणि कुवेतमध्ये चांगली मागणी आहे. या कामातून तुम्ही कमी वेळात जास्त पैसे कमावू शकता.

सुकलेल्या लिंबानं घरातील ही काम होतील अधिक सोपी; फरश्या- किचन होईल चकचकीत स्वच्छ

याशिवाय ब्लड स्टॉक एजंट बनूनही तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. यामध्ये घोडे कमिशनवर ग्राहकांना विकले किंवा विकत घेतले जातात.

Web Title: horse grooming jobs make you earn lakhs of rupees