नखं कापत असताना कुत्र्याने असं काही केलं की, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 13:34 IST2019-10-17T13:33:44+5:302019-10-17T13:34:34+5:30
कुत्रा आणि त्याच्या प्रामाणिक पणाबबात आपण अनेक गोष्टी ऐकतो. पण तुम्हाला माहीत आहेत का? हे ड्रामा करण्यातही फार हुशार असतात बरं...

नखं कापत असताना कुत्र्याने असं काही केलं की, व्हिडीओ झाला व्हायरल
कुत्रा आणि त्याच्या प्रामाणिक पणाबबात आपण अनेक गोष्टी ऐकतो. पण तुम्हाला माहीत आहेत का? हे ड्रामा करण्यातही फार हुशार असतात बरं... असं आम्ही नाही तर टिकटॉकवर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून दिसून येत आहे.
टिक टॉकवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी आपली कुत्र्याची नखं कापत आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? अहो... या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही कुत्र्याचे एक्सप्रेशन पाहा. एवढी नाटकं कदाचितच कोणी करत असेल.
जसजशी मुलगी नेलकटर नखं कापण्यासाठी कुत्र्याच्या पायाजवळ घेऊन जाते. तसतशे कुत्र्याचे एक्सप्रेशन्स बदलत जातात. एवढचं नाहीतर हा ड्रामेबाज नंतर खालीच पडतो. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आतापर्यंत 5.8 मिलियन्सपेक्षा जास्त लाइक्स मिळाले असून हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेक लोकांनी हा व्हिडीओ शेअर करत फार फनी कॅप्शन दिलं आहे.
एका व्यक्तीने व्हिडीओला कॅप्शन देत असं लिहिलं आहे की, हा ड्रामा किंग आहे. तर आणखी एका यूजरने असं लिहिलं आहे की, 'मला तर हसू आवरताच येत नाही'. तर व्हिडीओ पाहून आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, 'या कुत्र्याच्या अॅक्टिंगला माझा सलाम'
पाहा या ड्रामेबाजचे आणखी व्हिडीओ :