इथे त्सुनामी येतेय की काय? या व्हिडीओ उडवली अनेकांची झोप, जाणून घ्या सत्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 15:29 IST2022-06-17T15:27:03+5:302022-06-17T15:29:15+5:30
Tsunami Cloud: रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या या क्लीपमध्ये ढगांचं एक विशाल रूप बघायला मिळतं. पहिल्यांदा जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की, जणू त्सुनामी येत आहे. हे दृश्य समुद्राच्या लाटांसारखं दिसत आहे.

इथे त्सुनामी येतेय की काय? या व्हिडीओ उडवली अनेकांची झोप, जाणून घ्या सत्य...
Tsunami Cloud: निसर्गाच रूप इतकं अफाट आहे की, कधी काय बघायला मिळेल काही सांगता येत नाही. निसर्गाचं हेच अफाट रूप दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक हा व्हिडीओ बघून निशब्द झाले आहेत. रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या या क्लीपमध्ये ढगांचं एक विशाल रूप बघायला मिळतं. पहिल्यांदा जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की, जणू त्सुनामी येत आहे. हे दृश्य समुद्राच्या लाटांसारखं दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मला आधी असं वाटलं की, ही त्सुनामी आहे. मी याआधी कधीही असे ढग पाहिले नाहीत'. हा व्हिडीओ कुठला आहे अजून समजू शकलेलं नाही. शेअर केल्यापासून ही पोस्ट व्हायरल झाली आहे. आतापर्यंत या पोस्टला 90 हजारांपेक्षा जास्त अपवोट आणि 2,300 पेक्षा जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत.
एका यूजरने लिहिलं की, 'मला खरंच अशी वाईट स्वप्ने आली आहेत'. एका दुसऱ्या व्यक्तीने कमेंट केली की, 'मी असं काही जेव्हा थिएटरमध्ये पाहिलं होतं तेव्हा खूप ओरडलो होतो. असंच दिसत होतं ते'. एकाने लिहिलं की, 'मी माझी कार पॅक करत आहे आणि तिथून पळत आहे'. अशा वेगवेगळ्या कमेंट्स हजारो लोकांनी केल्या आहे. लोक हे दृश्य पाहून अवाक् झाले आहेत. खरंच निसर्ग किती अफाट आहे असं हे पाहिल्यावर वाटतं.