तो आला, हात जोडले, कान पकडले अन् देवाची मूर्तीच उचलून नेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 12:52 IST2024-01-15T12:52:09+5:302024-01-15T12:52:26+5:30
मेरठच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील स्पोर्ट्स स्टेडियमजवळ बालमुखी मातेचे मंदिर आहे.

तो आला, हात जोडले, कान पकडले अन् देवाची मूर्तीच उचलून नेली...
चोराच्या मनातही भीती असते, हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका चोराने चक्क देवाची मूर्तीच चोरून नेली. यावेळी तो देवा मला माफ कर, असे म्हणताे, हात जोडताना आणि कान पकडताना दिसतो आहे.
मेरठच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन हद्दीतील स्पोर्ट्स स्टेडियमजवळ बालमुखी मातेचे मंदिर आहे. पुजारी प्रदीप गोस्वामी रविवारी सकाळी मंदिरात पोहोचवले असता मंदिरात दुर्गादेवीची अष्टधातूची मूर्ती न आढळल्याने त्यांना धक्काच बसला. त्यांनी मूर्तीची शोधाशोध केली, मात्र मूर्ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही तपासला असता चोरीचा प्रकार समोर आला.
सीसीटीव्हीनुसार, निळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक तरुण मंदिरात येतो. त्याने डोक्यावर काळी टोपी घातली होती. त्याने सुरुवातीला देवासमोर हात जोडले अन् कान पकडले. त्यानंतर त्याने मंदिरातील महागडी मूर्ती उचलली अन् जॅकेटमध्ये टाकून लंपास केली.