भावा, 'adidas'चे शूज पाहिले असशील, पण 'ajitdas'चे पाहिलेस का?; इंटरनेटवर सुरू आहे धम्माल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:36 IST2022-11-22T15:26:21+5:302022-11-22T15:36:46+5:30
आदिदास वरुन आनंद महिंद्रा यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियात आदिदासचे आणखी काही नातेवाईक तयार झाले आहेत. इंटरनेवर धमाल सुरु आहे.

भावा, 'adidas'चे शूज पाहिले असशील, पण 'ajitdas'चे पाहिलेस का?; इंटरनेटवर सुरू आहे धम्माल
देशात परदेशात अनेक प्रसिद्ध ब्रॅंड आहेत ज्यांचे लोक चाहते आहेत. चाहत्यांची ही क्रेझ पाहता अनेक जण खोडसाळसपणे अशा प्रसिद्ध ब्रॅंडची कॉपी करतात. अगदी हुबेहुब त्याच प्रकारे वस्तु तयार करुन नावही मिळतेजुळते देतात. यामुळे ग्राहक सहज फसतात आणि ती वस्तु खरेदी करतात. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो म्हणजे 'आदिदास चा भाऊ अजितदास चा'.
Adidas आदिदास हा प्रसिद्ध sports स्पोर्ट्स ब्रॅंड आहे हे सर्वांना माहितीच आहे. मात्र त्याचा भाऊ Ajitdas अजितदास ला कधी बघितले आहे का ? उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत अजितदासचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो बघून असे वाटते अरे हे तर आदिदासचे शूज आहेत. मात्र नीट लक्ष देऊन बगितले तर त्यावर अजितदास लिहिलेले दिसेल. ग्राहकांना अगदी सहज फसवण्याचे हे काम आहे.
आनंद महिंद्रा यांनी कॅप्शन मध्ये लिहिले, 'याचा अर्थ होतो आदि चा एक भाऊ आहे ज्याचे नाव अजित आहे. वसुदैव कुटुंबकम'. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर युझर्सने अजुनच विनोदी कमेंट केल्या आहेत. एका युझरने आदिदासचे वडिल असे लिहित आदिदास सारखाच एक टीशर्ट दाखवला ज्यावर कालिदास असे लिहिले आहे.
Completely logical. It just means that Adi has a brother called Ajit. Vasudhaiva Kutumbakam? 😊 pic.twitter.com/7W5RMzO2fB
— anand mahindra (@anandmahindra) November 22, 2022
Adidas's father 🌚 pic.twitter.com/39McHQ6QId
— Jharnalika Baruah (@jharnalika) November 22, 2022
Mr Das has twins. Identical twins. adi & ajit .
— Dr. Shashibhushan (@drsbhushan) November 22, 2022
आदिदासच्या नातेवाईकांचा शोधच जणू नेटकरी लावत आहेत.आदिदासचा आणि भारताचा किती जवळचा संबंध आहे अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. मात्र ग्राहकांनो तुम्हीही यामध्ये फसू नका. ब्रॅंडेड वस्तु घेताना नीट बघुनच घ्या नाहीतर त्या ब्रॅंडचा कोणता नातेवाईक हाती लागायचा.